एकनाथ खडसेंच्या जिल्हा दूध संघात सव्वा कोटीचा गैरव्यवहार

चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी केली पोलिसांत चौकशीसाठी तक्रार.
Mandakini Khadse
Mandakini KhadseSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा दूध (District Milk federation) संघात लोणी साठ्यात तब्बल सव्वा कोटीचा गैरव्यवहार (Scam) आढळून आला आहे. या प्रकरणी दूध भुकटी (Milk Powder) व लोणी (Butter) इन्चार्ज महेंद्र केदार व विक्री विभागप्रमुख अनंत अंबीकर यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत (complain in Police station) तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याची माहिती चेअरमन मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (FIR register against two employees in Jalgaon Milk federation)

Mandakini Khadse
मुक्ताईनगरला ठाकरे-शिंदे गटात हाणामारी

जिल्हा दूध संघात गैरव्यवहाराचे जे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्याची वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी आमदार एकनाथ खडसे व चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

Mandakini Khadse
`आरटीओ`चे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी लागेबांधे?

या वेळी माहिती देताना चेअरमन खडसे यांनी सांगितले, की कोजागरी व दिवाळी सणानिमित्ताने आपण शुक्रवारी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्या समवेत प्रकल्पाला भेट देऊन संघात असलेल्या दूध व लोणी व दूध भुकटी याच्या साठ्याचा आढावा घेतला. श्री. लिमये यांना सर्व साठ्याची भौतिक तपासणी करण्याबाबत सूचना दिल्या.

...असा घडला प्रकार

कार्यकारी संचालकांनी एका टीमला शनिवारी (ता. ८) रात्री साडेनऊला दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्याची भौतिक पडताळणी करण्याच्या सूचना दिल्यात. यात साठा रजिष्टर, रेकॉर्डमध्ये असलेला साठा व प्रत्यक्ष तपासणी केलेल्या साठ्यात तफावत आढळून आली. ती लपविण्यासाठी २ ऑक्टोबर २०२२ मध्ये रेकॉर्डमध्ये १४ टन गाय लोणीची गाडी वाई (जि. सातारा) येथील शीतगृहात डिस्पॅच केलेली आहे. याची किंमत साधारणतः ७० ते ८० लाख रुपये आहे. परंतु संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवजनुसार ही गाडी प्रत्यक्षात भरून संघाच्या आवाराबाहेर गेलेली नाही.

वाहनांच्या चुकीच्या नोंदणीमुळे हे दिसून येत आहे, की १४ टन लोणी साठा रेकॉर्डपेक्षा कमी आहे. या साठ्याची भौतिक पडताळणी रात्री अडीचपर्यंत सुरू होती. कार्यकारी संचालक त्या ठिकाणी उपस्थित होते. आता वाई येथे ज्या शीतगृहात साठा ठेवण्यात आला आहे, तेथे किती साठा आहे, हे तपासणीसाठी ९ ऑक्टोबरला संघाने अधिकारी व सुरक्षा कर्मचारी व अंतर्गत लेखापरीक्षक याचे पथक मे. पी. डी. शहा कोल्ड स्टोरेज, वाई येथे रवाना केले आहे. त्याठिकाणी किती साठा आहे, हे तपासणी केल्यानंतर पुढील अधिक तपशील मिळणार आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. ११) संघाकडे असलेली दूध भुकटीच्या साठ्याच्या पडताळणीचे निर्देश कार्यकारी संचालकांनी दिले. त्यामध्ये सुद्धा सुमारे नऊ टन अंदाजित किंमत रुपये ३० ते ३५ लाख हा रेकॉर्डपेक्षा कमी आढळून आला.

दोघे निलंबित

या प्रकरणी दूध भुकटी व लोणी यांचे विभागप्रमुख महेंद्र नारायण केदार व विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर यांना मंगळवार (ता. ११) निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येत असून, चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी सांगितले. या वेळी संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये उपस्थित होते.

दोषींवर कारवाई व्हावी

आमदार खडसे म्हणाले, की चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. गेल्या सहा- सात महिन्यांत अधिकारी स्तरावर हा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी पोलिस तक्रार देण्यात येत आहे. मात्र संघातर्फे अंतर्गत चौकशीही करण्यात येईल त्यातून जे निष्पन्न होईल त्याची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्यात येईल. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी संचालकांची मागणी आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com