CBSE Shivaji History Cut Controversy : आमदार तांबेंनी मंत्री भोयर यांचं खोटं पकडलं; चुकीचं उत्तर देताच भर सभागृहात झापलं!

CBSE Shivaji Maharaj history cut controversy in Maharashtra Assembly: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 68 शब्दांत घेतलेल्या इतिहासावरून आमदार सत्यजीत तांबे सभागृहात आक्रमक होते.
CBSE Shivaji history controversy
CBSE Shivaji history controversySarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj CBSE Syllabus Issue: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (CBSE) केवळ 68 शब्दात समावेश करण्यावरून नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे चांगलेच आक्रमक झाले.

आमदार तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर यांनी दिलेल्या चुकीच्या उत्तरावर देखील संताप व्यक्त केला. 'अधिकारी उत्तराखारत काहीही लिहून देतात, अन् ते आपण सभागृहात वाचून दाखवता, हे चुकीचं आहे,' अशा शब्दात, सत्यजीत तांबे यांनी मंत्री डाॅ. भोयर यांनी दिलेल्या उत्तरावर झापलं.

नाशिक (Nashik) पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी, "'सीबीएसई'च्या पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर, केवळ 68 शब्दांमध्ये उल्लेख केला असून, हीच सर्वात आपल्यासाठी खेदाची बाब आहे." महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देश पातळीवर जाऊ शकत नसेल, यासारखं आपल्यासाठी दुर्दैव कोणतंही नाही. यावर चर्चा करण्यासाठी सभागृहात आम्हाला वारंवार प्रश्न मांडावा लागत आहे, हे कुठेतरी शालेय शिक्षण विभागाचा अपयश आहे, असा घणाघात आमदार तांबेंनी केला.  

'राज्य सरकारने स्वतः अभासक्रम तयार करून सीबीएसईला द्यायला हवा होता. तुम्ही 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगत असाल, तर आम्ही लिहून देतो, मग सांगा छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत ते! असा प्रयत्न व्हायला हवा होता. शालेय शिक्षण विभाग, असा काही प्रयत्न करणार आहेत का? असा माझा प्रश्न आहे, असे म्हणत,' आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं.  

CBSE Shivaji history controversy
Ahilyanagar Mali Wada issue : पुरातन वेस हटवण्यावरून राजकारण पेटले; 'त्या' मागणीवरून नगरकर संतप्त; हरकतींमधून महापालिका प्रशासनावर प्रहार

सत्यजीत तांबे यांच्या या प्रश्नांवर राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर यांनी, "2200 ते 2500 शब्दां पर्यंत आपल्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश आहे. पण त्या अभ्यासक्रमामध्ये सर्व इतिहास मांडू शकत नाही. तरी देखील, सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काय वाढवता येईल, हा प्रयत्न सुरू आहे." यासाठी आपणाकडून दोनदा-तीनदा वेळ मागितली होती. आपण दिल्लीला जाऊ, असं नियोजन होतं. पण आपलं शेडूल एवढं व्यस्त असतं की, आपण वेळ देऊ शकला नाहीत. परंतु माझा प्रयत्न अजूनही सुरू आहेत. तुम्ही कितीही व्यस्त असला, तरी मी तुम्हाला तिथं घेऊनच जाणार, असे मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले. 

CBSE Shivaji history controversy
District Collector minister meeting rule : जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावा.., आता मंत्र्यांच्या आदेशाला देवाभाऊंची कात्री!

मंत्री भोयरांचा दिल्लीचा दावा तांबेंनी खोडला

मंत्री डाॅ. भोयर यांनी उपस्थित केलेल्या वेळेच्या मुद्यावर, सत्यजित तांबे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मंत्री डाॅ. भोयर यांना चांगलच सुनावलं. ते म्हणाले, तुम्ही मला दिल्लीला जायचं आहे, या संदर्भात काहीही सांगितलेलं नाही. तुम्हाला पत्र देखील लिहिलं आहे. माझं सोडून द्या, तुम्ही तरी जायला पाहिजे होतं. आमचे सोडून द्या, आम्ही येणं गरजेचं आहे किंवा नाही, हा नंतरचा मुद्दा आहे. मंत्री महोदयाचं सोडा शालेय शिक्षण विभागाचा साधा क्लार्क सुद्धा तुम्ही दिल्लीला पाठवलेला नाही, असा घणाघात केला.

अधिकारी उत्तर म्हणून काहीही लिहून देतात...

'तुम्ही ज्या 2200 ते 2500 शब्दांचा उल्लेख करत आहात, तो 'राइज ऑफ मराठा' त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किती उल्लेख आहे, याचा देखील अभ्यास केला पाहिजे. तुमचे अधिकारी काहीतरी लिहून देतात आणि तुम्ही त्यावर सभागृहात उत्तर देतात हे अत्यंत चुकीचे आहे,' असेही आमदार तांबे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com