Shivraj Singh Chauhan : कृषिमंत्री कोकाटे शेतकऱ्यांसाठी 'माणिक' तर भगरे उगवतील 'नवी पहाट'!

Shivraj Singh Chauhan On Nashik Leaders : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या उपमांनी नाशिकच्या लोकप्रतिनिधींना अक्षरश: गुदगुल्या झाल्या. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांसाठी माणिक ठरतील अशी स्तुती त्यांनी केली.
Bhaskar Bhagre, Shivraj Singh Chauhan, Manikrao Kokate
Bhaskar Bhagre, Shivraj Singh Chauhan, Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 04 Jan : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या उपमांनी नाशिकच्या लोकप्रतिनिधींना अक्षरश: गुदगुल्या झाल्या. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे शेतकऱ्यांसाठी माणिक ठरतील अशी स्तुती त्यांनी केली. केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी नाशिकमध्ये केलेल्या भाषणात शेतकर्‍यांविषयी आत्मीयता असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना विविध उपमा दिल्या. या उपमांनी उपस्थित त्यामध्ये खसखस पिकली. आमदार, खासदार आणि मंत्री मोहरून गेले. सुरुवातीलाच कृषिमंत्री चौहान (Shivraj Singh Chauhan) म्हणाले, कृषिमंत्री कोकाटे हे यशस्वी मंत्री होतील. ते शेतकऱ्यांसाठी "माणिक" सिद्ध होतील. त्यांच्या हातून शेतकऱ्यांचे (Farmers) प्रश्न नक्कीच सुटतील.

व्यासपीठावरील आमदार खासदारांचेही त्यांनी विविध उपमा देत कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagre) यांना ते म्हणाले, भास्कर म्हणजे सूर्य. हे खासदार भगरे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट आणतील यात मला शंका नाही. काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचेही त्यांनी कौतुक केले ते म्हणाले खासदार बच्छाव नक्कीच सगळ्यांचीच "शोभा" वाढवतील.

Bhaskar Bhagre, Shivraj Singh Chauhan, Manikrao Kokate
Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्यासपीठावर उपस्थित हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचीही त्यांनी स्तुती केली ते म्हणाले हे आमदार तर "हिरा" आहेत. हे मी मनापासून सांगतो आहे. कृषिमंत्र्यांनी व्यासपीठावरील आमदार खासदार आणि मंत्र्यांना दिलेल्या या उपमा चर्चेचा विषय ठरला. यावेळी ते म्हणाले की, कृषिमंत्री कोकाटे यांनी मला निवेदन दिले आहे.

मात्र, निवेदन हे फार धोकादायक असते. मला निवेदन दिले की मी पुढे अधिकाऱ्यांकडे पाठवतो. अधिकारी त्यावर विविध नकारात्मक सूचना टाकून पुन्हा मला पाठवून देतात. यामध्ये मूळ प्रश्न काही सुटत नाही. त्यामुळे मला निवेदन देऊ नका आपण समक्ष आणि अधिकाऱ्यांसह बसू आणि चर्चा करून प्रश्न सोडवू.

Bhaskar Bhagre, Shivraj Singh Chauhan, Manikrao Kokate
Chhagan Bhujbal : भुजबळांचा सूचक इशारा; म्हणाले, 'निर्णय घेतला आहे, योग्य वेळ आल्यावर...'

शेती अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र त्याचा आत्मा शेतकरी आहे. मी शेतकऱ्यांमध्ये देव पाहतो. सध्याचे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हित पाहणारे आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी गंभीर पुढाकार घेत आहोत. त्याला लवकरच यश मिळेल असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com