Dr. Bharti Pawar: केंद्रीय मंत्री भारती पवार यांना कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांचा सवाल!

आक्रमक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रसरकारने दुजाभाव थांबवावा अशी मागणी केली.
Dr Bharti Pawar
Dr Bharti PawarSarkarnama
Published on
Updated on

निफाड : स्वर्गीय शरद जोशी प्रणित जिल्हा शेतकरी संघटनेने (Shetkari Sanghtna) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांना निवेदन दिले. सध्या कांद्याचे (Onion) होत असलेले हाल आणि घसरलेले दर याबाबत लक्ष घालावे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. (Onion growers are in problem due to rates are continuesly down)

Dr Bharti Pawar
NCP News: राष्ट्रवादी म्हणते, रस्तेच खराब; मगटोल का द्यावा?

ज्या जिल्ह्यात कांदा पिकतो तेथील आपण प्रतिनिधित्व करीत असल्याने या प्रश्‍नाची आपल्याला जाणिव आहे असे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

Dr Bharti Pawar
Nana Patole: नाना पटोले देतील का नाशिक काँग्रेसला अध्यक्ष!

निवेदनात कांद्याच्या बाजारात वाणिज्य मंत्रालयाद्वारे होणाऱ्या सरकारी हस्तक्षेप थांबवावा. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने 'आवश्यक वस्तू कायदा' वापरून कांद्याच्या किमती नियंत्रित करण्याचा वाईट प्रघात पाडला आहे. 'विदेश व्यापार कायदा' वापरून कांद्याची निर्यात थांबवणे इतिहासात क्वचितच घडले असावे. व्यापारी तूट सहन करत असलेल्या देशातील विदेश व्यापार विभागाने कुठल्याही निर्यातीवर बंधन घातल्यास तूट वाढणे क्रमप्राप्त आहे. ‘प्राईज स्टेबिलायझेशन फंड' योजनेंतर्गत नाफेड एफपिओ मार्फत खरेदी केलेला कांदा यंदा कांद्याचे भाव किफायतशीर होण्यातील मोठा अडथळा ठरणार आहे.

सरकारी धोरणामुळे, कांदा उत्पादक, व्यापारी आणि ग्राहक यांचावर होणारे वित्तीय परिणाम तसेच राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक परिणाम या संबंधी शेतकरी संघटनेचे आकलन अन्न व नागरी पुरवठा तथा वाणिज्य व व्यापारमंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांच्या निरीक्षणार्थ ठेवणे प्रासंगिक ठरेल. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी याआधी कांदा प्रश्नी आपण दाखवलेली आस्था लक्षात घेऊन आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मध्यस्थी करण्याची विनंती करावी अशी सूचना केली. निवेदनावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील बहाळे, नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, निफाड तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोंबले व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com