भारती पवार बांधावर, `म्हणाल्या, केंद्र शेतकऱ्यांच्या पाठीशी`

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध भागाची डॉ. भारती पवार यांनी पाहणी केली.
Dr Bharti Pawar, Centre Minister
Dr Bharti Pawar, Centre MinisterSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : गेल्या आठवड्यात झालेल्या अतीवृष्टी (Heavy Rainfall & Flood) आणि पूरामुळे नुकसान झालेल्या निफाड, येवला (She visit Niphad & Yeola) भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. (She shown sympathy with farmers) केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, (Centre will be with farmers) असा धीर त्यांनी दिला.

Dr Bharti Pawar, Centre Minister
...तर माझी मालमत्ता गिरीश महाजनांना दान करेन!

जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडून काढले. जोरदार पावसाने शेती व शेतमाल, नागरिक, दुकानदार, व्यापारी तसेच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पाझर तलाव क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याचे छोटे बंधारे, पाझर तलाव फुटून त्या परिसराचे नुकसान झाले. आधीच कोरोना संकटातून जनता सावरत नाही तोच अस्मानी संकटाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. त्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन मोठे नुकसान झाले. बहुतांशी भाग हा पाण्याखाली गेल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. याच्या पाहणीसाठी केंद्रीय आरोग्य व बालकल्याण राज्यमंत्री डॉ पवार यांनी निफाड येवला मतदार संघातील बाधित गावांना भेट देऊन पाहणी केली.

Dr Bharti Pawar, Centre Minister
नाशिक महापालिकेची निवडणूक छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली!

लासलगाव परिसरातील गावांना भेट देत तेथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली नंतर लासलगाव येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी केली. या प्रसंगी डॉ. पवार यांनी नुकसानीचे पंचनामे करण्यात अधिकाऱ्यांनी दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई नुकसानग्रस्तांना मिळावी यासाठी अधिकारी वर्गास सूचना केल्या. या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे, वाहून गेली आहे. गाढवे नाल्याला पूर येऊन प्रतापसागर तलाव फुटल्याने तेथील आदिवासींच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ते उघड्यावर आले. बाधित नागरिकांना तातडीची मदत द्या. शासनाच्या आपत्कालीन निधीतून तात्पुरत्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, जिल्हा परिषद सदस्य डी. के. नाना जगताप, जिल्हाध्यक्ष सुवर्णताई जगताप, प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार घोरपडे, आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, संजय शेवाळे, राजेंद्र चाफेकर, पंढरीनाथ पीठे यांसह नागरिक उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com