नाशिक : गोदावरीच्या विकासासाठी शहरात नमामि गंगे च्या धर्तीवर अठराशे खोटी खर्चाच्या नमामि गोदा या प्रकल्पास केंद्र शासनाने सुमारे तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्याबाबत महापालिका तसेच महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kukarni) यांनी पाठपुरावा केल्याने त्यांचे कौतुक केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra singh Shekhawat) यांनी केले.
दोंडाईचा वरवाडे नगर परिषद पाणीपुरवठा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी नमामि गंगे च्या धर्तीवर अठराशे खोटी खर्चाच्या नमामि गोदा या प्रकल्पास केंद्र शासनाने सुमारे तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यासंबंधी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना माहिती दिली. त्याबाबतचा निधी लवकर द्यावा अशी विनंती केली.
याप्रसंगी जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी त्यांच्या भाषणामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या नमामि गोदा प्रकल्पासाठी त्यांच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत मंजुरी दिल्याचे सांगितले. त्यासाठी तात्काळ डीपीआर सादर करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरेाबर हा प्रकल्प २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापुर्वी पुर्ण करु असे आश्वासन दिले. महापौर कुलकर्णी यांनी या प्रकल्पासाठी भेट घेऊन पाठपुरावा केल्याबाबत त्यांचे कौतुक केले.
महापौर कुलकर्णी यांनी जलशक्ती मंत्रालय तसेच मंत्री शेखावत यांना धन्यवाद दिले.महानगरपालिकेच्या वतीने नमामि गोदा प्रकल्पाचा डीपीआर तात्काळ सादर करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे, माजी मंत्री जयकुमार रावल यांसह दोंडाईच्या नगर परिषदेचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.