Dr. Bharti Pawar: चक्रधर स्वामींच्या दूरदृष्टीमुळेच महिलांचा सहभाग वाढला

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अखिल भारतीय महानुभाव संमेलनास भेट दिली.
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti PawarSarkarnama

नाशिक : श्री चक्रधरस्वामींनी (Chakradhar Swamy) सांगितलेल्या तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांना (Womens) दर्शनाचा, भक्तीचा अधिकार मिळाला पाहिजे. हा विचार स्वामींची दूरदृष्टी (vision) दर्शवितो. कारण याच विचारांचा परिणाम म्हणजे आज अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याला संपूर्ण देशभरातून येथे उपस्थित झालेल्या नारीशक्तीचे दर्शन आपल्याला घडत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी येथे केले. (Dr. Bharti Pawar visited Mahanubha sect cofrence in Nashik)

Dr. Bharti Pawar
MVP Election: ‘मविप्र’मध्ये ‘परिवर्तन’; अॅड नितीन ठाकरेंचे पॅनल विजयी

अखिल भारतीय महानुभाव संमेलनात पहिल्याच दिवशी सायंकाळच्या सत्रात डॉ. सौ. पवार यांनी संमेलनाला भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड, प्रकाश घुगे, प्रकाश नन्नावरे, प्रभाकर भोजने, शीतल सांगळे, औरंगाबाद येथील नागराजबाबा ऊर्फ आत्याबाई आदींसह देशभरातून आलेले संत-महंत, कवी उपस्थित होते. आयोजन समितीचे दिनकर (अण्णा) पाटील यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.

Dr. Bharti Pawar
ACB Action: चक्क शौचालयात घेतली दहा हजाराची लाच

संमेलनात मंगळवारी ठरावाद्वारे मांडण्यात येणाऱ्या सात मागण्यांचा उल्लेख करून त्यांनी मंत्री डॉ. पवार यांना निवेदन दिले. डॉ. पवार म्हणाल्या, की देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने कोरोनाकाळापासून आतापर्यंत तब्बल २११ कोटी लसीकरण पूर्ण करून एवढा मोठा टप्पा गाठणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. तसेच, भारतीय संस्कृतीचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे.

देशाच्या आत्मगौरवात साधु-संतांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे जेथे जाल तेथे साधु-संतांचे आशीर्वाद घ्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात. त्यामुळे या संमेलनाच्या आयोजनातून आणि येथे येण्याची संधी मिळाली. यामुळे नाशिककर म्हणून आपण धन्य झालो आहोत. त्याचप्रमाणे गुरूंच्या आदेशाप्रमाणे जीवनात आचरण केल्यास आयुष्यात कधीच निराशा येणार नाही, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. माधुरी पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

आठशे वर्षांपूर्वी भगवान श्री चक्रधरस्वामी यांनी मांडलेले तत्त्वज्ञान आणि विचार आजच्या काळातही मोलाचे आहेत. महानुभाव पंथाच्या विचारांची सुरवात आज जितक्या मोठ्या प्रमाणावर झाली, ती खूप पूर्वीच व्हायला हवी होती. त्यामुळे धर्मप्रचाराची शृंखला कायम राहिली असती. जीवनात संस्काराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीवर संस्कार करण्याची गरज असून, आपल्या धर्मपंथाला देशापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण जगात त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा, असे प्रतिपादन डॉ. बिडकरबाबा यांनी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com