Mangesh Chavan: भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

Threat to BJP MLA Mangesh Chavan by Kisanrao Jorvekar: मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे. त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी झाडेन, अशी धमकी महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
Mangesh Chavan
Mangesh ChavanSarkarnama

Jalgaon News: जळगाव लोकसभा निवडणुकीनंतर द्वेषाच्या राजकारणाने खालची पातळी गाठली आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांना भर रस्त्यावर पिस्तूलने गोळ्या घालण्याची धमकी देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनातील हा धमकीचा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे, त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. शपथ घेऊन सांगतो मी तुला संपवून टाकेल, माझं वय 73 आहे.मला कॅन्सर, मधुमेह आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी झाडेन, अशी धमकी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी ही धमकी दिली आहे. यावेळी माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख हे देखील उपस्थित होते.

दुष्काळी अनुदानासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावरून उन्मेष पाटील आणि चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

सरकारी पेन्शन घेणाऱ्या आणि हजारो रुपयांचे दुष्काळी अनुदान मिळवणाऱ्या पाटील यांचे हे आंदोलन स्वतःसाठी आहे. गरीब शेतकऱ्यांविषयी त्यांना काहीही कळवळा नाही, अशा शब्दांत उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावरून टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी मंगेश चव्हाण यांनी ही धमकी दिल्याचे समजते.

या धमकीमुळे महायुतीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी गुंडागिरीची भाषा करणाऱ्या नेत्याला अटक करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com