Vijaykumar Gavit : चंद्रकांत रघुवंशी यांनी विजयकुमार गावित यांचा डाव उलटवला

Chandrakant Raghuvanshi on Vijaykumar Gavit : रघुवंशी यांनी पुन्हा एकदा कट्टर विरोधक विजयकुमार गावित यांना डिवचले. डॉ गावित यांची दुसरी कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे.
Vijaykumar gavit, heena gavit
Vijaykumar gavit, heena gavitSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena : लोकसभा निवडणुकीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्येचा पराभव झाला. आता त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष असलेली दुसरी कन्या राजकीय अडचणीत आली आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ हिना गावित यांचा लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. त्यानंतर आता डॉ गावित यांची दुसरी कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे.

हा अविश्वास प्रस्ताव कोणी दाखल केला? हे मोठे रहस्य आहे. कारण कोणत्याही एका पक्षाकडे सध्या अविश्वास प्रस्ताव मंजूर होईल एवढे संख्याबळ नाही. त्यावरून आता पुन्हा एकदा मंत्री गावित विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी (Chandrakannt Raghuvanshi) यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे.

आरोप प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा नंदुरबारचे राजकारण चर्चेत आले आहे. यावेळी रघुवंशी यांनी मंत्री गावित यांना चिमटा काढण्याची संधी सोडलेली नाही. यानिमित्ताने अविश्वास प्रस्तावाचे राजकारण काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

Vijaykumar gavit, heena gavit
Chhagan Bhujbal Politics: भुजबळांच्या जिल्ह्यातच धान्य वितरण ठप्प, दुकानदार झाले आक्रमक

यासंदर्भात माजी आमदार रघुवंशी यांनी हा अविश्वास प्रस्ताव बनावट आहे, असे सांगितले. या अविश्वास प्रस्तावाशी शिवसेना एकनाथ शिंदे Eknath Shinde पक्ष अथवा काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही, असा धक्कादायक दावा केला आहे.

ते म्हणाले, अविश्वास प्रस्तावावर सह्या केलेले वीस सदस्य गावित यांचे समर्थक आहेत. यातील एक सदस्य तर मंत्री गावित यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. त्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव खोटा आहे.

Vijaykumar gavit, heena gavit
Chhagan Bhujbal Politics: भुजबळांच्या जिल्ह्यातच धान्य वितरण ठप्प, दुकानदार झाले आक्रमक

यामागे राजकीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतो. एक मात्र खरे आहे की, अविश्वास प्रस्ताव जरी खोटा असला तरी त्यातील कारणे मात्र खरी आहेत. रघुवंशी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा गावित यांना आपले लक्ष्य केले आहे.

रघुवंशी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. मंत्री गावित भाजपचे आहेत. हे दोघेही महायुतीचे सदस्य आहेत. मात्र नंदुरबारच्या राजकारणात हे दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.

Vijaykumar gavit, heena gavit
Chhagan Bhujbal Politics: भुजबळांच्या जिल्ह्यातच धान्य वितरण ठप्प, दुकानदार झाले आक्रमक

लोकसभेत (Loksabha) पराभवाची चाखलेल्या मंत्री डॉ गावित यांना त्रास देण्याची संधी त्यांचे विरोधक सोडण्यास तयार नाहीत. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांकडून परस्परांविरुद्ध जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे.

या मोर्चे बांधणीचा एक भाग म्हणूनच जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याची चर्चा आहे. यामध्ये सामान्य कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात सापडले आहेत. अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे कोण आणि कोणाच्या बाजूचे याची एक चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com