चंद्रकांतदादांचा पेढा एकनाथ खडसेंनीही मग गोड मानून घेतला...

Eknath Khadse | Chandraknat Patil | : अन्याय झाला ते सोडा... आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणार...
Eknath Khadse | Chandrakant Patil
Eknath Khadse | Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : ''मी अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केले आहे. आताही विरोधी पक्षाचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील चुका, उणिवांवर प्रहार करण्याची संधी मला मिळाली आहे, त्या संधीचे सोनं करण्याचा मी प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केला. ते आज विधान परिषदेमध्ये सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर बोलत होते. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (Eknath Khadse Latest News)

खडसे यांना यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पेढा भरवून अभिनंदन केले. खडसेंनीही तो सहर्षपणे स्विकारला. दोन्ही नेत्यांनी यावेळी राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडविले. २०१७ मध्ये फडणवीस सरकारमधून राजीनामा दिल्यापासून खडसेंचा राजकीय विजनवास सुरू होता. विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली, आणि मुलगी रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली. पण त्यांच्या पराभव झाला. तेव्हापासून ते भाजप नेतृत्वावर नाराज होते.

Eknath Khadse | Chandrakant Patil
अडीच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नाथाभाऊंचा आवाज पुन्हा घुमणार... पण आता फडणवीस समोर असणार!

त्यानंतर मागील वर्षी एकनाथ खडसे यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारणाला वैतागून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून त्यांना विधान परिषदेवर पाठविणार असल्याचे संकेत मिळत होते. अखेरीस जुन महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे खडसेंनी अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात प्रवेश केला आहे. आता यावेळी चंद्रकांतदादा यांनी खडसे-भाजप युद्धात साखर पेरणी करुन संघर्षाची धारही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. खडसेंनीही चंद्रकांतदादांना प्रतिसाद देत त्यांच्याशी संवाद साधला.

Eknath Khadse | Chandrakant Patil
आंध्राच्या राजकारणात मोठे वादळ; YSR रेड्डींच्या जयंतीदिवशीच आईने सोडली मुलाची साथ

अन्यायावर बोलताना खडसे म्हणाले की, अन्याय झाला ते आता सोडा. आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचा पाठपुरावा केला तर त्यावर नक्कीच न्याय मिळू शकतो. त्यामुळे सभागृहात पक्षाची भूमिका मांडणारच, पण त्यासोबत सर्वसामान्यांच्या प्रश्नानांही प्राधान्य देणार आहे. याचवेळी त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून काम करायला आवडेल का, असं विचारलं असता, ते पक्ष ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com