
Bhujbal Vs Kokate News: छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. एक अनुभवी मंत्री म्हणून मंत्रिमंडळात आणि जिल्ह्यातही त्यांचा प्रभाव वाढेल. यामध्ये ते आपल्या राजकीय विरोधकांना सहज माफ करतील का? याची चर्चा सुरू झाली आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि नवनियुक्त अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ आता एकाच पक्षात आणि मंत्रिमंडळात सहकारी आहे. मांडीला मांडी लावून ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतील. मात्र शरीराने एकत्र आले तरी मनाने ते एकत्र येतील का? हा चर्चेचा विषय आहे.https://www.youtube.com/watch?v=SV1yekfftbk
जिल्ह्याच्या राजकारणात कोकाटे आणि मंत्री छगन भुजबळ यांचे सख्ख्या जगजाहीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात पैकी बहुतांशी आमदारांचा देखील मंत्री भुजबळ यांच्याशी सहजासहजी जमत नाही. त्यामुळे जिल्ह्यात भुजबळ यांचे वर्चस्व असेल मात्र पक्षाच्या सहकारी आमदार व मंत्र्यांतील संवाद किती सहज होईल, हे आत्ताच सांगता येत नाही.
त्यामुळे राजकारणात जाहीरपणे आणि तोंडावर गोड बोलणारे देखील प्रत्यक्ष काय करतील याचा नेम नसतो. त्यामुळे मंत्री झालेले भुजबळ आणि कोकाटे यांच्या वादाला आता कोणते स्वरूप मिळणार याची चर्चा लपून राहिलेली नाही. श्री. भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी देखील त्याचे स्वागत केले आहे.
मंत्री भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून परिचित आहेत. जिल्ह्यातील कोणत्या आमदाराला गुलाल घेऊन द्यायचा आणि कोणाला घरी बसवायचे याचे नियोजन त्यांचे सहकारी अचूक करीत असतात. त्याचा फटका यापूर्वी कोकाटे, दिलीप बनकर यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध आमदारांना बसला आहे.
आता भुजबळ आणि कोकाटे यांची पहिली स्पर्धा जिल्हा परिषद निवडणुकीत होणार आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना आपली कन्या सीमांतिनी कोकाटे हिला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करायचे आहे. त्यांचे हे राजकीय उद्दिष्ट ते एकटेच मंत्री असताना सोपे होते. त्या मार्गात कोणाचा अडसर असेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सिन्नर तालुक्यात तरी ही चर्चा जोरात आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल इथपासून श्री भुजबळ यांचे नियोजन असते. उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेपासून तर सभापती आणि अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भुजबळ यांचा शब्द नेहमीच वजनदार राहिला आहे. आता पुन्हा एकदा त्याची प्रचिती येणार आहे.
कृषिमंत्री कोकाटे आणि मंत्री भुजबळ यांची पहिली राजकीय स्पर्धा आणि परीक्षा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होणार आहे. सध्या तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा मर्यादित गटांतच प्रभाव आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा मात्र जिल्ह्याच्या जवळपास निम्म्याहून अधिक गटांवर प्रभाव आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे या स्पर्धेत माणिकराव कोकाटे यापूर्वी आघाडीवर होते. त्यांच्या मार्गात भुजबळ यांचा मोठा अडसर असेल.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.