Chhagan Bhujbal News : धमकीच्या पत्रानंतर छगन भुजबळांनी जाहीर केली भूमिका, म्हणाले...

Death Threat Letter : छगन भुजबळ यांना आलेल्या पत्रामध्ये त्यांना सावध करण्यात आले आहे. भुजबळ यांना मारण्यासाठी पाच लोकांनी 50 लाखांची सुपारी घेतली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी धमकीचे पत्र मिळाले. भुजबळ यांची सुपारी घेऊन त्यांना मारण्याचा प्लॅन करण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. पत्र पाठवणाऱ्याने भुजबळ यांन सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या पत्रानंतर भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या पत्रावर भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Chhagan Bhujbal News)

Chhagan Bhujbal
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या ताफ्यात ब्रेकफेल झालेला पिकअप घुसला, घातपाताचा संशय

'जे पत्र आले आहे, त्यातील तपशील आणि माहिती गंभीर स्वरूपाची आहे. त्याविषयी काय करायचे याचा निर्णय पोलिस घेतील. ते मी पोलिसांवर सोडले आहे. मात्र, माझ्याबाबत असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीदेखील अनेकदा असे प्रकार झालेले आहेत. माझ्यावर हल्लेदेखील झाले आहेत. मात्र, त्याला घाबरून माघार घेणारा मी नाही. मी घरी बसणार नाही. माझे काम सुरूच राहील,' अशा शब्दांत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली भूमिका जाहीर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही महिन्यांत भुजबळ यांना फोनवरून तसेच मेसेज करून धमकी दिली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळांना सावध करणारे पत्र आल्याने पोलिसदेखील सतर्क झाले आहेत. यापूर्वीच भुजबळ यांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

पत्रामध्ये काय?

छगन भुजबळ यांना आलेल्या पत्रामध्ये त्यांना सावध करण्यात आले आहे. भुजबळ यांना मारण्यासाठी पाच लोकांनी 50 लाखांची सुपारी घेतली आहे. या लोकांची मीटिंग एका हाॅटेल समोर झाली. ते तुम्हाला मारण्यासाठी रात्रभर तुमचा शोध घेत फिरत होते, अशा आशयाचा मजकूर भुजबळांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये आहे.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com