
नाशिक : (Nashik) एसटीचे (MSRTC) विलीनीकरण व्हावे यासाठी काहींनी संप घडवून आणला होता. अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांनी काय काय केले होते. अगदी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला देखील केला होता. मग तीच मंडळी आता सत्तेत आहेत. त्यांनी विलीनीकरण करावे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे राज्याचे (Maharashtra) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. (Those who deemands ST merger are in Power know, why they don`t do it)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या क्षमता वाखानन्याजोगी आहे. त्यामुळेच ते मंत्रीमंडळ विस्तार करत नसावे, असा टोला लगावला.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमीत आहे. वेतन मिळत नसल्याने काही ठिकाणी आंदोलन झाले आहे. एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळ शासकीय सेवेते विलीन करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यांचे वकिल गुणवंत सदावर्ते या विषयवर काय, काय भूमिका मांडत होते. अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर दगडफेक, हल्ला करण्यापर्यंत या गोष्टी गेल्या होत्या. त्यावेळेला आज सरकारमध्ये असलेल्या अनेक लोकांनी त्यांच्या मागणीला पाठींबा दर्शवला होता. आता त्यांचेच सरकार आहे, मग त्यांनी विलीनीकरण करावे. त्यानंतर पगाराचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
कर्मचाऱ्यांनी याबाबत अनेक आक्षेप घेतले होते. मोर्चे काढले. आंदोलन केले. शरद पवारांच्या घरावर हल्ला केला. मग आता त्या मागणीवर त्यांनी सरकारशी बोलावे. त्यांची मागणी सरकारकडून मान्य करून घ्यावी म्हणजे आपोआप सर्व प्रश्न सुटतील. समस्याच शिल्लक राहणार नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.