Labour fedration news; येवल्यात भुजबळ-दराडे, तर सिन्नरमध्ये कोकाटे-वाजे सामना

जिल्हा मजूर संस्थेसाठी २५ डिसेंबरला मतदान; २६ ला मतमोजणी
Chhagan Bhujbal & Manikrao Kokate
Chhagan Bhujbal & Manikrao KokateSarkarnama

नाशिक : जिल्ह्यातील (Nashik) सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा (Co-oprative) मार्ग खुला झाला असून, पुढे ढकलण्यात आलेल्या नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन (Labour fedration) निवडणुकीसाठी मतदान, मतमोजणीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. मजूर संस्थेसाठी २५ डिसेंबरला मतदान होणार असून, २६ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. (All leaders involvement in Labour fedration election)

Chhagan Bhujbal & Manikrao Kokate
Sanjay Raut News; `त्या` नगरसेवकांसाठी शिवसेनेचे दार कायमचे बंद झाले!

या निवडणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ, (Chhagan bhujbal) आमदार माणिकराव कोकाटे, (Manikraon kokate) नरेंद्र दराडे, (Narendra Darade) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Chhagan Bhujbal & Manikrao Kokate
Manikrao Kokate news; सिन्नरच्या निवडणुकांत कोकाटे समर्थक जोमात?

ग्रामपंचायतच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने गेल्या महिन्यात घेतला. यामुळे नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४ डिसेंबरला मतदान होऊन मतमोजणी होणार असताना २९ नोव्हेंबरला शासनाने निवडणूक आहे, त्या टप्यावर स्थगित केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिका सुनावणीत खंडपीठाने ही स्थगित उठविली. जिल्हा मजूर संस्थेच्या आठ तालुक्यांत एक-एकच उमेदवार शिल्लक राहिल्याने या तालुका संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.

सात तालुका प्रतिनिधी संचालकांसह जिल्हास्तरावरील पाच अशा एकूण १२ जागांसाठी आता ३६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हास्तरावरील पाच राखीव जागांपैकी महिला गटात दोन जागांसाठी दीप्ती पाटील, अनिता भामरे व कविता शिंदे, इतर मागासवर्गीय प्रवर्ग गटात पवन अहिरराव, अर्जुन चुंभळे, संदीप थेटे, मिलिंद रसाळ, अनुसूचित जाती-जमाती गटात शशिकांत उबाळे, हेमंत झोले, किरण निरभवणे, उत्तम भालेराव, रविकांत भालेराव, अशोक रोकडे उमेदवार आहेत. भटक्या विमुक्त जाती-जमाती गटात राजाभाऊ खेमनार, अप्पासाहेब दराडे, सुदर्शन सांगळे, सुरेश देवकर, बन्सीलाल कुमावत यांच्यात लढत होत आहे.

येवला आणि सिन्नर तालुका संचालक पदाची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची असणार आहे. येवल्यामध्ये सविता धनवटे व मंदा बोडके यांच्यात लढत होत असली, तरी यामागे माजी मंत्री छगन भुजबळविरुद्ध आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे असा सामना होत आहे. धनवटे यांच्यामागे भुजबळ यांनी ताकद लावली आहे, तर बोडके यांच्यासाठी दराडे, संभाजी पवार, माणिकराव शिंदे हे त्रिमूर्ती एक झाले आहेत.

सिन्नरमध्येही आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांच्याविरुद्ध दिनकर उगले अशी सरळ लढत होत आहे. मात्र, उगले यांच्यासाठी आमदार कोकाटे, तर भारत कोकाटे यांच्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे रिंगणात उतरले आहेत. चांदवडमध्ये शिवाजी कासव यांच्यासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व शरद आहेर यांच्यासाठी भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे रिंगणात उतरले असून, त्यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. १२ जागांसाठी २५ डिसेंबरला सकाळी आठ ते चार या वेळात क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मतदान होणार आहे, तर २६ डिसेंबरला सकाळी आठपासून काशीमाळी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com