Chhagan Bhujbal Politics: मंत्री छगन भुजबळांचे प्रयत्न यशस्वी...काँग्रेसच्या आंदोलनाच्या दिवशीच कांदा उत्पादकांना १८ कोटींचे अनुदान!

Chhagan Bhujbal; Food & Civil Minister Chhagan Bhujbal efforts success, Nashik Districts Onion Producers got financial aid-दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निफाड व अन्य बाजार समित्यांत विक्री केलेल्या कांदा उत्पदकांना अनुदान झाले मंजूर
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल साडे तीनशे रुपये अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान देण्यास सरकारने विलंब केला. त्यामुळे विरोधी पक्षांसह शेतकरी संघटनांनी राज्य शासनावर टिकेची झोड उठवली होती. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत पाठपुरावा केला.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित १६६८ शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले. जिल्ह्यातील ९६७२ शेतकऱ्यांना १८.५८ कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न समित्या, खाजगी बाजार थेट पणन अनुज्ञप्तीधारक आणि नाफेड केंद्राकडे दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडे तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजुर करण्याचा शासन निर्णय घेतला. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री झालेल्या कांदा उत्पादकांना त्याचा लाभ मिळाला.

Chhagan Bhujbal
Election Commission Vote Theft: माजी आमदार संजय चव्हाण यांचा धक्कादायकआरोप, गुजरातहून होती ऑफर...५ कोटींत दीड लाख मतं सेट करतो!

राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या निकषांत सात बारा उतारा बंधनकारक होता. उताऱ्यावरील नोंदी नसल्याने काही शेतकरी अडचणीत आले होते. ते अनुदानापासून वंचीत राहिले. येवला-लासलगाव मतदारसंघातील १६६८ शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील सुमारे साडे नऊ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले.

याबाबत मंत्री भुजबळ यांनी अपात्र ठरलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारण्यात आला. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याची मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली होती. त्याबाबत मंत्री गोरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानंतर १८.५८ कोटींचे अनुदान मंजूर झाले.

गेले दोन वर्षे नाशिकसह राज्याच्या विविध कांदा उत्पादक जिल्ह्यांत कांद्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. कांदा दर मोठ्या प्रमाणात कोसळले. अद्यापही शेतकरी त्या संकटातून सावरू शकलेला नाही. याबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने शासनाविरोधात भूमिका मांडली जात होती.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com