Bhujbal V/s Maratha : भुजबळ म्हणाले, तर माझी सर्व मालमत्ता तुम्हाला देऊन टाकतो!

Maratha Reservation Issue - मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले.
Chhagan Bhujbal & Manoj Jarange-Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange-PatilSarkarnama
Published on
Updated on

Bhujbal V/S Jarange Patil : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेच्या खर्चावरून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली होती. हा वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. आज भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांचा नामोल्लेख टाळत, मला ५०० कोटी द्या आणि माझी सर्व मालमत्ता घेऊन जा, असे आव्हान दिले. (Chhagan Bhujbal replied to his critics po Property)

मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) सातत्याने विविध टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) (Ajit Pawar) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा याबाबत टीका केली आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange-Patil
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी आणखी एका युवकाने जीवन संपवलं !

अंतरवाली सराटी येथील सभेवर मंत्री भुजबळ यांनी टीका केली होती. तसेच या सभेला सात कोटी रुपयांचा निधी लागल्याचा आरोप केला होता. त्याला जरांगे-पाटील यांनी सभेतच उत्तर दिले होते. आम्ही जमीन विकत घेतली नाही. भुजबळ जमिनी विकत घेतात, त्यामुळे त्यांना सगळीकडे तसेच दिसते, या शब्दात त्यांनी भुजबळ यांना फटकारले होते.

यासंदर्भातील वाद अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. त्यावर भुजबळ यांनी काल नाशिक येथे आव्हान दिले. हे करताना त्यांनी जरांगे-पाटील यांचे नाव घेतलेले नाही. मात्र त्यांचे लक्ष्य जरांगे पाटीलच होते. जरांगे-पाटील यांनी भुजबळांकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे वक्तव्य केले होते.

याबाबत मंत्री भुजबळ यांनी त्यांच्या संपत्तीबाबत टीका करणारांना उपरोधिक सल्ला दिला. ते म्हणाले, ‘माझ्याकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याची टीका केली जाते. आता बोलण्यापासून कुणाला अडवावे? ही लोकशाही आहे. लोकांच्या वाट्टेल ते बोलण्यामागे प्रसिद्धी असते. माझ्याकडे इतकी संपत्ती असेल, तर मला ५०० कोटी आणून द्या अन् माझी सर्व संपत्ती घेऊन जा, असे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange-Patil
Ajit Pawar News : पालकमंत्रीपदाची सुत्रे घेताच अजितदादा पुन्हा सक्रीय; अन्य पक्षांमध्ये वाढली अस्वस्थता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com