Chhagan Bhujbal : धक्कादायक ! छगन भुजबळांच्या पीएकडे एक कोटींची खंडणी मागणाऱ्यास अटक; आयकर छापा टाकणार असल्याची दाखवली भीती

Bhujbal PA extortion News : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांना गेल्या आठवड्यात धमकी देण्यात आली होती.
Nashik crime news
Nashik crime news Sarkarnama
Published on
Updated on

Nashik crime: नाशिक शहरात गेल्या आठवड्यात बनावट एफडीए अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता बनावट आयकर अधिकाऱ्यांचे रॅकेटही उघड झाले आहे. यामध्ये चक्क एका मोठ्या राजकीय नेत्यालाच गोवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे उघड झाले आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांना गेल्या आठवड्यात धमकी देण्यात आली होती. भुजबळ यांच्या निवासस्थानी इन्कम टॅक्स विभागाचा छापा पडणार असल्याचे कळविण्यात आले होते. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले होते.

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांना हा पर्सनल व अनोळखी नंबरवरून फोन आला होता. यामध्ये भुजबळ यांच्या घरावर इन्कम टॅक्सच्या छापा पडणार आहे. टाळण्यासाठी एक कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

या मागणीनंतर एकच खळबळ उडाली होती. भुजबळ यांच्या कार्यालयातून याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे गायकवाड यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला होता. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी संबंधित अनोळखी नंबर ट्रेस केला होता. नंबरचा शोध घेतला असता संबंधित फोन धरमपूर (गुजरात) येथील असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचल्यावर संबंधित राहुल भुसारे यास करंजाळी (दिंडोरी) येथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी आला असता पोलिसांनी अटक केली.

नाशिक शहर पोलिसांनी या संदर्भात 24 एप्रिल ते 16 मे दरम्यान मोहीम राबवली. त्यात त्यात आरोपीला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयातून अधिकृत माहिती देण्यात आली. अंबड पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन ट्रक सुपारी जप्त केली होती. त्याचवेळी याच विभागाचे खबरी असलेल्या दोघांनी बनावट एफडीए अधिकारी असल्याचे सांगत दोन ट्रक सुपारी ताब्यात घेतली होती. त्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

बनावट अधिकाऱ्यांचा सुळसुळाट आणि वाढत चाललेले गुन्हे हा गंभीर विषय बनला आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक येथील अधिकाऱ्यांना मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. खंडणी वसुली प्रकरणात नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच आता थेट मोठ्या राजकीय नेत्याला खंडणीसाठी धमकावण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com