Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Chhagan Bhujbal Politics: मंत्री छगन भुजबळ यांचा निवडणूक अजेंडा ठरला... `या`वर असेल भर!

Chhagan Bhujbal Says My Development Work is For Society: येवला मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात भुजबळ म्हणाले, "मी तर सर्व समाजांसाठी काम करतो"
Published on

Chhagan Bhujbal News: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ काल आपल्या येवला मतदारसंघात होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे लोकार्पण केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आमदार आणि मंत्री मतदार संघात लक्ष घालू लागले आहेत. विशेषतः महायुतीचे सरकार असल्याने या पक्षाच्या घटक असलेल्या आमदारांनी किती विकास कामे केली याची आकडेवारी मांडायला सुरुवात केली आहे. यात आता मंत्री भुजबळ देखील पुढे आले आहेत.

मतदार संघातील पाटोदा येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी मी केलेली विकास कामे सर्व समाजांसाठी आहेत. सर्व समाजांना डोळ्यापुढे ठेवूनच मी मतदारसंघात विकास केला आहे. त्यावर सातत्याने काम करीत आलो आहे, असे सांगितले.

मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी नुकतेच येवला मतदारसंघात पोहोचले. या प्रकल्पातील पाणी मतदारसंघात आणल्यामुळे भुजबळ समर्थकांनी त्याचा जोरदार प्रचार आणि मायलेज घेण्याचा प्रयत्न देखील केला.

Chhagan Bhujbal
Dr Heena Gavit Politics: हिना गावित यांनी खासदार पाडवी यांना फटकारले, काय आहे कारण?

सतरा वर्षांपासून या प्रकल्पावर काम सुरू होते. या कालावधीत मांजरपाडा प्रकल्प पूर्ण झाला. त्यातून गुजरातला वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून डोंगरगाव पर्यंत वळविण्यात आले.

त्यामुळे येवला मतदारसंघात पाणी पोहोचले. आगामी काळात अधिक बंधारे बांधून येवल्यातील विविध भागात पाणी कसे पोहोचेल, यासाठी काम करत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेत असल्याचे, भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले

गेली वीस वर्षे येवल्याचे प्रतिनिधित्व करणारे श्री भुजबळ हे राज्यात मंत्री म्हणून देखील काम करीत आले आहे. या मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदारसंघासाठी हजारो कोटींची विकास कामे केली, असा त्यांचा दावा आहे.

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis Politics: आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही अजित पवारांचे वावडे?

भुजबळ यांनी केलेल्या विकास कामांमध्ये येवला- नाशिक रस्ता ५६० कोटी रुपये, लासलगाव- विंचूर- खेडलेझुंगे या रस्त्यासाठी १३४ कोटी रुपये खर्च झाले. शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यावर ११ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुक्ती भूमीसाठी ३० कोटींचा खर्च झाला. लासलगाव येथे लवकरच उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरच विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने मतदारसंघात विविध राजकीय घटक सक्रीय होताना दिसतात. विरोधकांकडून जोरदार राजकीय मोर्चे बांधणी करण्यात येत आहे. विशेषतः मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर विशेष चर्चेत आहे.

विरोधकांना उत्तर म्हणून भुजबळ यांनी आपली रणनीती निश्चित केली असावी, असे त्यांच्या अलीकडच्या दौऱ्यातून दिसते. त्या दृष्टीनेच मतदारसंघात केलेली विकास कामे सर्व समाज घटकांसाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण आणि धोरण कोणत्या दिशेने जाणार याची चुणूक मंत्री भुजबळ यांच्या विधानांवरून आली आहे. त्यामुळे आगामी काळात भुजबळ मराठा आणि ओबीसी हा फॅक्टर साईड ट्रॅक करणार की काय? अशी चर्चा त्यांच्या विरोधकांत होऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com