Chhagan Bhujbal Politics: भुजबळांना का लागलेत दिल्लीच्या राजकारणाचे वेध?

Why Bhujbal is not happy in state politics now :राज्याच्या राजकारणातील बदलत्या स्थित्यंतराने छगन भुजबळ अस्वस्थ असल्याचे कयास
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal OBC Politics : महाराष्ट्रातील राज्यसभेची दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यासाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना आता दिल्लीचे वेध लागले आहेत.

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या एका जागेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राजकीय खलबते सुरू झाली आहेत. ही जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विविध इच्छुक तयारीला लागले आहेत. यामध्ये मुख्य नाव राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंत्री भुजबळ हे नाखूष असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून काम केल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपसह विविध नेत्यांना थेट भुजबळ फार्म गाठावे लागले होते.

नाशिक मतदारसंघातून भुजबळ उमेदवारीसाठी एक प्रबळ दावेदार होते. मात्र महायुतीतील पक्षांच्या राजकीय ओढाताणीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळू शकली नव्हती. त्यामुळे शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून भुजबळ नाराज होते. त्यांची नाराजी त्यांनी विविध सूचक वक्तव्यातून प्रकट केली होती.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News : भुजबळांची कबुली; महायुतीत भाजपच मोठा भाऊ...

लोकसभा निवडणुकीसाठी (loksabha Election) राज्यातील ओबीसी राजकारणाचे प्रतिनिधी किंवा चेहरा म्हणून भाजपला भुजबळ हवे होते. राष्ट्रीय स्तरावरून तसा संदेश देण्यात आला होता. भुजबळ ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आजवर काम करीत आले आहेत. मात्र राज्यस्तरावरील राजकारणात आणि मुख्य प्रवाहात त्यांना तेवढे मोठे स्थान मिळू शकले नव्हते.

भुजबळ यांच्याबरोबर काम करणारे विविध नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमध्ये भुजबळ यांच्या महात्मा फुले राष्ट्रीय समता परिषदेचे मेळावे देखील झालेले आहेत. त्यामुळे आता भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांच्या समर्थकांचा देखील तसा दबाव आहे. यापूर्वी देखील भुजबळ यांनी ओबीसींचा राष्ट्रीय पक्ष स्थापन करावा, असे सुचविण्यात आले होते.

Chhagan Bhujbal
Ncp Politics News : नाशिकचा कोणता आमदार अजित पवारांची साथ सोडणार?

भुजबळ यांनी आता राज्यसभेच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामागे ओबीसींचे राष्ट्रीय राजकारण हा एक प्रमुख घटक आहे. त्यामुळे भुजबळ यांचे राज्याच्या राजकारणात मन रमत नसल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भुजबळ वेगळा निर्णय घेणार होते असे सूत्रांकडून समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com