मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

विचारपूस करून ताफ्यातील गाडीतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठविले.
Chhagan Bhujbal at Accident place
Chhagan Bhujbal at Accident placeSarkarnama
Published on
Updated on

सिन्नर : एरव्ही मंत्र्यांच्या (Ministers) वाहनांचा ताफा म्हणजे कशाचीही परवा न करता सुसाट जातो. मात्र सिन्नरच्या नागरिकांना काल एक वेगळा अनुभव आला. पुणे रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात झाला तेव्हा तेतून जाणारे पालकमंत्री (Guardian Minister) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थांबले. त्यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस करून त्यांना रुग्णालयात पोहोचवले. त्यामुळे अपघातग्रस्तांनीही कृतज्ञता व्यक्त केली.

Chhagan Bhujbal at Accident place
नऊ वर्षानंतर उघडणार नाशिक साखर कारखान्याचे कुलूप!

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील कार्यक्रमातून परतत असतांना नाशिक पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झालेला होता.

Chhagan Bhujbal at Accident place
दमणगंगेचे पाणी वळवून सिन्नरचा दुष्काळ संपवणार!

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपल्या कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने सिन्नर येथील रुग्णालयात पाठविले.

त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या स्वीय सहायकाना सूचना करत सिन्नर येथील डॉक्टरांना माहिती देऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अपघात ग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे मार्गस्थ झाला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com