Jayant Patil ED Inquiry News : आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील यांची ईडी चौकशी सुरु आहे. पाटील यांच्या चौकशीवरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जातात हे आपण पाहतो आहे. त्याचा वापर पहिल्यांदा माझ्यावर झाला. त्याआधी ईडी (ED) हे काय प्रकरण आहे हे कोणाला माहितही नव्हते. ते पुढे म्हणाले की, वेळोवेळी देशभरामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा रितीने ईडीचा वापर केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने त्यादिवशी सांगण्यात आले की भीती निर्माण करू नका, दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. लोकशाही मार्गाने विरोध करणे, एवढेच आपल्या हातात आहे. कितीही वेळा जयंत पाटील यांची चौकशी केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगतिले आहे की त्यांच्याकडे लॉन्ड्री आहे. त्यांच्याकडे धुलाईची पावडर गुजरातमधून येते. अशा प्रकरणात त्यांच्याकडे गेल्यास त्या मशिनमध्ये टाकले जाते, मग त्या पावडरने त्यांना स्वच्छ केले जाते' असा टोला भुजबळ यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन केले जात आहे. इस्लामपूरचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर ईडी आणि भाजापाविरोधात आंदोलन केले पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात येत असून त्यांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरबाजीही करण्यात आली.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.