Jarange Patil & Bhujbal : जरांगे पाटील फक्त मलाच का टार्गेट करीत आहेत?

Chhagan Bhujbal says, why Jarange-Patil blaim only me-छगन भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणातील अडथळे दूर व्हावेत असे मला वाटते.
Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Issue : मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी भूमिका मी कधीही घेतलेली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील केवळ मला टार्गेट का करतात?. माझ्यावरच टीका का करतात, असे प्रश्न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. (Manoj Jarange-Patil is on Nashik tour today)

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या (Maharashtra) विविध भागांचा दौरा करीत आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्यात त्यांनी ओबीसी (OBC) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Sunil Tatkare News : तटकरेंचा शरद पवारांवर कटाक्ष; यापूर्वी पक्षात संवादाची भूमिकाच नव्हती!

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषण-आंदोलन सुरू असलेल्या पांगरी (सिन्नर), नाशिक शहर तसेच येवला येथे जरांगे पाटील भेट देणार आहेत. आज ते नाशिकला येणार असून, पांगरी येथे त्यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

यासंदर्भात भुजबळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यासाठी विधेयक आणले असताना त्याला मी पाठिंबा दिला होता. आता मराठा समाजाच्या आरक्षणातील अडथळे दूर करायला हवेत, अशी माझी भूमिका आहे.

नांदेडच्या सभेत भुजबळ यांच्यावर टीका केली. त्याला भुजबळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ओबीसीऐवजी मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, असे अनेक जण बोलत आहेत. मग जरांगे पाटील हे माझ्या एकट्याविरुद्ध का बोलताहेत? असा प्रश्‍न मला पडतो.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Nanded Hospital News : नांदेडमधील मृत्यू रोखण्यासाठी काँग्रेस सरसावली; नवीन भरती होईपर्यंत ५० परिचारिका देणार सेवा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com