Sunil Tatkare News : तटकरेंचा शरद पवारांवर कटाक्ष; यापूर्वी पक्षात संवादाची भूमिकाच नव्हती!

There was no comminication in party from last some years-प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगापुढे केलेल्या आरोपाचा केला पुनरुच्चार!
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Tatkare on NCP Leader Sharad Pawar : निवडणूक आयोगापुढे अजित पवार गटाने केलेल्या आरोपाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पुनरुच्चार केला. गेली दहा बारा वर्षे पक्षात आम्ही घेतलेल्या सध्याच्या निर्णयाप्रमाणे जाण्याची भूमिका होती. मात्र, त्यावर संवादच होत नव्हता. आता तो संवाद आणि निर्णय दोन्ही झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. (Previously also there was a intension to go with BJP)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Sunil Tatkare
Nanded Hospital News : नांदेडमधील मृत्यू रोखण्यासाठी काँग्रेस सरसावली; नवीन भरती होईपर्यंत ५० परिचारिका देणार सेवा...

या वेळी तटकरे यांनी अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातूनच अनेक प्रश्न सुटत असतात. त्यामुळे आम्ही राज्यातील शिवसेना, भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. महाराष्ट्रातील जनता नक्कीच आमच्या या भूमिकेला पाठिंबा देईल, असे सांगितले.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला निर्णय हा आमच्या पक्षाच्या मूळ विचारधारेला अनुसरूनच आणि ठाम होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल आणि निवडणूक आयोगाची स्वायतत्ता तसेच पक्षाच्या संदर्भात वेळोवेळी दिलेले निकाल याबाबत कायद्याच्या कसोटीवर उतरणाराच निर्णय आम्ही घेतलेला आहे. येत्या सोमवारी पुन्हा याबाबत सुनावणी होणार आहे.

नजीकच्या भविष्यातदेखील जी भूमिका आम्ही मांडत आलो आहोत, ती भूमिका आम्ही मांडू. राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यावर राज्याला अधिक गतिमान करावे, वेगवेगळे प्रश्न सोडवावेत. महिला, युवक, शेतकरी, कृषिमालाच्या भावाचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून या सर्व विषयांना गती देता येते, या भूमिकेतूनच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.

या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, सरोज अहिरे, अॅड. माणिकराव कोकाटे, माजी खासदार देविदास पिंगळे आदी उपस्थित होते.

Sunil Tatkare
Caste Census News : 'इंडिया' आघाडी करणार भाजपची कोंडी; लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com