Chhagan Bhujbal News: शरद पवारांना 'जाणता राजा' म्हणण्यात अडचण काय ? छगन भुजबळांचा सवाल

Chhagan Bhujbal On Sharad Pawar : भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवर पांघरूण घालण्यासाठीच धर्मवीर - स्वराज्यरक्षक वाद सुरू...
Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Chhagan Bhujbal, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal On Sharad Pawar : छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्याचं रक्षण केलं, म्हणून अजित पवारांनी त्यांना स्वराज्यरक्षक म्हटलं आहे. पण त्यांना कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकता. ही सर्वच आपली दैवतं आहे असं विधान करतानाच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात काय अडचण आहे असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

याचवेळी त्यांनी पवारांना दिलेली जाणता राजा ही बिरुदावली मला मान्य आहे असंही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केलं आहे.

छगन भुजबळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विधानावर आपलं मत व्यक्त केलं आहे. भुजबळ म्हणाले, शरद पवारांसह मी स्वत: फिरलो आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं आहे. पवारांनी औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्रश्न असेल किंवा महिलांचे प्रश्न किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडवले आहेत. आणि जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे ? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा अशा शब्दांत भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Hingoli News: भाजपला दावा सांगू द्या, आम्हाला काही बोलायचे नाही असे आदेश आहेत..

अजित पवारांच्या विधानावर भुजबळ म्हणाले, अजित पवारांनी संभाजीमहाराजांचा अपमान केलेला नाही. याउलट भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांना कमी लेखण्याचं काम केलं आहे. पण पवारांनी तसं काही केलं नाही. भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर पांघरूण घालण्यासाठी हा वाद सुरू आहे. जर अजित पवारांचं चुकीचं असतं, तर विधानसभेत त्याचवेळी विरोधकांनी सांगायला हवं होतं की, हे रेकॉर्डवर चुकीचं जात आहे असे खडेबोलही विरोधकांना सुनावले आहे.

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
''105 वर्षांपासून महाराष्ट्र संभाजीराजेंना 'धर्मवीर' म्हणून ओळखतो;पण कोल्हेंनी...''

आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा. शिवाजी महाराज यांचा इतिहास खूप मोठा आहे. एक-एक दोन-दोन पानांमध्ये मुलांना इतिहास समजतो का ?असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला आहे. चौथीपासून सातवीपर्यंत एक एक धडा अभ्यासक्रमात टाकायला हवा, पण काही वेळा इतिहास गाळला जातो असा आरोपही करण्यात आला आहे. याचवेळी इतिहासकार, लेखक यांनी याविषयी नेमकं मार्गदर्शन करावं असंही मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com