सुहास कांदेंना बंडखोरीचे गिफ्ट; एकनाथ शिंदेंनी रोखले छगन भुजबळांच्या ६०० कोटींना ब्रेक!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुहास कांदेच्या तक्रारीची दखल घेत ५६७ कोटींच्या निधीला दिली स्थगिती.
Suhas Kande, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
Suhas Kande, Eknath Shinde & Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होताच त्यांनी पहिल्याच दिवशी निर्णयांचा धडाका लावला. बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या तक्रारीची दखल घेतली. माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रशासकीय मान्यता दिलेल्या ५६७ कोटींच्या निधी वाटपाला त्यांनी स्थगिती दिली. नवे सरकार येताच त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. (New Government given stay & ordered inquiry of Collector)

Suhas Kande, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधीमंडळाच्या कामकाजापासून रोखा!

आमदार सुहास कांदे यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी गंगाधरन टी . यांच्याशी चर्चा कळते. सरकार अल्पमतात असताना बैठक घेतलीच कशी असा सवाल करत तूर्तास हे काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नाशिक जिल्हा नियोजन समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Suhas Kande, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
पांडूरंगाची पूजा `एकनाथ`च करणार, पण परतल्यावर सरकार राहील का?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असताना तत्कालीन सरकारने निर्णयांचा धडाकाचा लावला. याबाबत भाजपने तक्रार कल्यानंतर २४ जूनपासून घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती राज्यपालांनी मागवली आहे. या कालावधीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीची आभासी बैठक घेतली. या बैठकीत ५६७ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. हा निधी सर्व मतदारसंघातील विकासकामांसाठी समान होता.

या विविध कामांसाठी शासनाने नाशिकला ६०० कोटींची मंजुरी दिली होती. निधीच्या खर्चाबाबत पालकमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या.

यासंदर्भात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दुरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. याबाबत आपण कोणत्याही कामांना मंजुरी दिलेली नाही. शिवसेना भाजपच्या आमदारांमध्ये याबाबत अधिक नाराजी आहे. निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याप्रकरणी नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि माजी पालकमंत्री भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे नियोजन समितीच्या निर्णयांकडे आमदारांचे लक्ष असते. सरकार अल्पमतात गेल्याने घाईघाईने हा निर्णय झाला होता. या कामांना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्थगिती दिली आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com