िNiphad Bribe Trap news : सावकारी करणाऱ्या व्यक्तीचा सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी निफाडच्या सहकार अधिकाऱ्याने दीड लाखाची लाच मागितली होती. या अधिकाऱ्याला ‘लाचलुचपत’ प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. (Niphad Cooperative officer caught by ACB for accepting Bribe)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याबाबत संबंधित सहकार (Co-operative) अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
निफाड तालुका सहकार उपनिबंधक कार्यालय सातत्याने चर्चेत आहे. यापूर्वी येथी सहायक सहकार उपनिबंधकास वीस लाखांची लाच घेतल्याने अटक करण्यात आली होती. आता त्याच कार्यालयाच्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.
सावकारीचा अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी निफाडच्या सहकार अधिकार्याने दीड लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाखांची रक्कम स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. मात्र, त्यानंतर काम करण्यास व लाच स्वीकारण्यास टाळाटाळ करू लागल्याने अखेर संबंधित सावकाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली.
निफाड येथील सहायक निबंधक सहकारी संस्थेतील सहकार अधिकारी (श्रेणी १) राजेश शंकर ढवळे (५३, रा. कृष्णा अपार्टमेंट, चेतनानगर, इंदिरानगर, नाशिक) असे लाच घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सावकारीचा अहवाल सकारात्मक करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवावा, यासाठी सहकार अधिकारी ढवळे याने तक्रारदाराकडे ६ सप्टेंबर २०२३ रोजी दीड लाखाची लाच मागितली होती. त्या तक्रारीनुसार ‘लाचलुचपत’च्या पथकाने पडताळणी केल्यानंतर ढवळे यास पंचासमक्ष तडजोडीअंती लाचेची १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारीही दर्शविली होती. त्यानुसार आज ही कारवाई झाली.
अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे, अविनाश पवार, संतोष गांगुर्डे, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.