Yeola news: महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने वाटले फुटाणे!

येवल्यात काँग्रेसने लक्षवेधी आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला.
Congress agitation at Yeola.
Congress agitation at Yeola.Sarkarnama
Published on
Updated on

येवला : केंद्र सरकारच्या (Centre Government) चुकीच्या धोरणामुळे महागाई गगनाला भिडली असून, सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याच्या निषेधार्थ तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे (Congress) शुक्रवारी महागाईचा निषेध करत सरपण, चूल विकून व फुटाणे वाटून गांधीगिरी करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुंवरील वाढविलेल्या जीएसटीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Congress office bearers given memorandum to Tahsildar)

Congress agitation at Yeola.
Congress News: मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण!

येथील विंचूर चौफुलीवर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरवात झाली. विंचूर चौफुलीवर कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाईचा निषेध नोंदवत येणाऱ्या-जाणाऱ्यांना फुटाणे वाटून महागाईचा प्रतीकात्मक निषेध करण्यात आला. घरगुती सिलिंडच्या वाढलेल्या किमतीमुळे प्रतीकात्मक चूल व सरपण विकून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Congress agitation at Yeola.
Nashik News: समता परिषदेच्या कार्यकारीणीत खांदे पालट!

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल,घरगुती सिलिंडरचे वाढलेले दर व जीवनावश्‍यक वस्तुंवरील वाढविलेल्या जीएसटीमुळे सामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे.

केंद्र सरकारने देशातील युवकांचा कोणताही विचार न करता घाईघाईने सुरू केलेली अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या योजनेला देशभरातून विरोध असतानाही सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून ही योजना कार्यान्वित केल्याने लाखो युवकांचे भविष्य अंधारात सापडले आहे, अशी टीका तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख व शहराध्यक्ष प्रीतम पटणी यांनी केली.

तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ‘महागाई कमी झालीच पाहिजे’, ‘पेट्रोल, डिझेल व सिलिंडरच्या किंमती कमी करा’, ‘जीएसटी रद्द करा’, ‘हुकूमशाही नही चलेंगी’, अशा विविध घोषणा दिल्याने परिसर दणाणला होता.

आंदोलनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, अण्णासाहेब पवार, राजे आबासाहेब शिंदे, अमित पटणी, विलास नागरे, बाबासाहेब शिंदे, शरद घोटेकर, रघुनाथ घोटेकर आदी सहभागी झाले होते.

सर्वसामान्यना आधार देणे, गरिबांच्या अडचणी दूर करणे, हे शासनाचे काम असते. मात्र, केंद्र शासनाने महागाई व जीएसटीच्या नावाखाली सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाली असून, आता तर जीवनावश्यक वस्तुंवरही जीएसटी लावला जात आहे.

-ॲड. समीर देशमुख, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com