Radhakrishna Vikhe Vs Congress : मंत्री विखेंकडून तीन उड्डाणपुलांचे भूमिपुजन; काँग्रेस, शिवसेनाची राज्याच्या सचिवांकडे तक्रार

Congress criticizes Ahmednagar flyover Bhumi Poojan before tender and start order : अहमदनगर शहरातील तीन नवीन उड्डाणपुलाची निविदा आणि कार्यारंभ आदेश नसताना भूमिपूजन झाल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवेसना ठाकरे पक्षाने केला. भाजप महायुतीचा चुनावी जुमला असल्याची टीका काँग्रेसने केली.
Radhakrishna Vikhe Vs Congress
Radhakrishna Vikhe Vs CongressSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील तीन उड्डाणपुलांच्या कामांची निविदा प्रसिद्धी झालेली नसतानाही कार्यारंभ आदेशही दिलेला नसताही पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या भूमिपजून कार्यक्रमावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाने आक्षेप घेतला आहे. हा चुनावी जुमल्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केला.

काँग्रेसचे (Congress) किरण काळे यांनी मुख्य सचिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. या अवैध कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहतात, हे त्याहून अधिक धक्कादायक असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी संबंधित खात्याने या प्रकाराची दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Radhakrishna Vikhe Vs Congress
Sharad Pawar And Shiv Sena Thackeray Party : ठाकरेंच्या 'मशाली'ला पवारांच्या 'तुतारी'चं बळ? शरद पवारांच्या भेटीत काय घडलं...

अहमदनगर नगर शहरातील पोलिस अधीक्षक चौक, एमआयडीसीतील नागापूर चौक आणि सह्याद्री चौक, अशा तीन ठिकाणी उड्डाणपूल होणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe), आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर शहरामधील या तीन उड्डाणपुलांच्या कामांचा प्रारंभ 3 ऑगस्टला करण्यात आला. सुजय विखे खासदार असतानाच या तीन उड्डाणपुलाच्या कामाची घोषणा करण्यात आली होती. परंतु या कामाची निविदा अजूनही प्रसिद्ध नाही. कार्यारंभ आदेश नाही, तरी देखील घाईघाईने पालकमंत्री विखे, आमदार जगताप यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आल्याच्या प्रकारावर काँग्रेसचे काळे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे गाडे यांनी आक्षेप घेतला आहे.

Radhakrishna Vikhe Vs Congress
BJP Vs NCP Pawar : राष्ट्रवादी पवार पक्षाची टीका जिव्हारी; भाजप असा काही तुटून पडला...

जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा

निविदा आणि कार्यारंभ आदेश नसताना भूमिपूजन कार्यक्रम करणे हा प्रकार चुकाचा, अवैध आणि जनतेची फसवणूक करणारा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या तीनही उड्डाणपुलाच्या कामांचा तातडीने निविदा प्रसिद्ध करावी. प्रशासकीय मंजुरीचा आदेश द्यावा. उड्डाणपुलाचे काम चांगल्या कंत्राटदाराला द्यावे. तशी खबरदारीच घ्यावी आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी, अशी मागणी काँग्रेसचे काळे यांनी केली आहे. कार्यारंभ आदेश नसताना या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहतात, हे धक्कादायक आहे, या प्रकाराची मंत्रालय स्तरावर चौकशी व्हावी, अशी देखील मागणी किरण काळे यांनी केली आहे.

चुनावी जुमला

विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शहराच्या आमदारांनी आयटी पार्क उभारत शहरातील हजारो तरुणांना रोजगार देत असल्याचा बनाव रचला होता. त्याचा भांडा फोड आम्ही केला. आता या निवडणुकीच्या तोंडावर देखील उड्डाणपुलांच्या बाबतीत, अशाच प्रकारे दिशाभूल करत जनतेला भुलविण्याचे काम सुरू आहे. मात्र नगरकर अशा गोष्टींना भूल नका, असे आवाहन किरण काळे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com