
Ahilyanagar political news : राहुल गांधी यांनी मत चोरीच्या आरोपांवरून देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. काँग्रेस या मुद्यावर सत्ताधारी भाजप युतीविरोधात आक्रमक आहे. काँग्रेसने देशभर आंदोलन पुकारलं आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे.
काँग्रेसचे संगमनेरमधील नेते बाळासाहेब थोरात यांनी बोगस मतदानावरून भाजपवर निशाणा साधला होता. यावरून घायाळ झालेले भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जोरदार पलटवार केला आहे.
मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, "थोरातांच्या टिकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. जनतेनेच त्यांना विधानसभेला उत्तर दिल आहे. त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे." बोगस मतदान 40 वर्षानंतर तुम्हाला समजलं का? असा सवालही मंत्री विखे पाटील यांनी केला.
बोगस मतदानावर (Voter) बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, "बोगस मतदान 40 वर्षांपासून तुम्हाला समजलं नाही का? बोगस मतदान होत आहे म्हणून! तुम्हाला लोकांनी निवडून देताना बोगस मतदान होतं का? कोणत्याही निवडणुकीचा निकाल खुल्या मनाने स्विकारला पाहिजे." तुम्ही आरोप करून तुमच्या मतदारांचा अपमान करत आहात, असा टोला देखील मंत्री विखे पाटलांनी लगावाला.
मुळा प्रवरा वीज संस्था पुनरूज्जीवनावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, आता या संस्थेचे काय पुनरूज्जीवन करणार? त्यावेळी हेतूपुरस्पर ही संस्था घालवली गेली. राज्याच्या जाणता राजाचा यात सिंहाचा वाटा होता, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्रत्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.
विखे पाटलांचे वर्चस्व त्यांना खुपत होतं. एक लाख शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला. राजकीय सुडापोटी ती संस्था उद्ध्वस्त झाली. आता पुनरूज्जीवन करण्याचे फायदे-तोटे बघावे लागतील. मात्र संस्था गेल्याचं मोठं दु:ख आहे, असे म्हणत मुळाप्रवरा वीज संस्था बंद पडल्याचं शल्य मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलं.
गोकुळ अष्टमी आणइ दहीहंडी आपला पारंपारीक सण असून, थरावर थर लावून दहीहंडी फोडली जाते. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अंगाने सर्वांना एकत्र आणण्याचं ते व्यासपीठ आहे. दहीहंडीची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रात विकासाचे थर लावतोय. लोकाभिमुख सरकार देण्याचा आमचा संकल्प असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.