Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या; बारामतीला परता म्हणत काँग्रेसने मतदारसंघावर ठोकला दावा

Congress claims Rohit Pawar Karjat-Jamkhed assembly constituency : आमदार रोहित पवार यांना काँग्रेसने पाच वर्षांसाठी मतदारसंघ दिला होता. बारामतीची जागा रिक्त झाली असून रोहित पवार यांनी बारामतीला परतावे, असा सल्ला देत काँग्रेसने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : बारामती सोडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आले, भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत तिथं आमदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहत आमदार रोहित पवार यांची आक्रमक शैलीची महाराष्ट्राला ओळख झाली.

आता आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात त्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकला असून, रोहित पवार यांनी आता बारामतीला जावे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

कर्जत-जामखेडमधील काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन ही मागणी वरिष्ठ नेतृत्वाकडे केली असल्याची माहिती दिली. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांच्या नातवाच्या मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकल्याने खळबळ उडाली आहे. कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील, जामखेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शहाजीराजे भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Rohit Pawar
Balasaheb Thorat : केंद्रातील भाजपची घमेंड महाराष्ट्राने उतरवली; थोरातांनी फसव्या योजनांवर घावच घातला

रोहित पवार निवडून आल्यानंतर त्यांनी मित्रपक्षाकडे दुर्लक्ष केले. ते आजतागायत आहे. त्यांच्या आमदारकीच्या यशात काँग्रेसचा सिंहाचा वाटा राहिलाय. सत्तांतरानंतर त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडला, विरोधकांची साथ दिली. काँग्रेसने मात्र आघाडीचा धर्म पाळला. स्थानिक स्वराज्य निवडणूक, नगरपंचायत निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँगेसला दुय्यमच वागणूक दिली. आता ही सर्व भरपाई करण्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून 2024 ला काँग्रेसला संधी हवीच, यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे एकमुखी मागणी करणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Rohit Pawar
Ajit Pawar politics: अजित पवारही जागे झाले, विधानसभेच्या तयारीसाठी काढली सन्मान यात्रा!

मतदारसंघाचा इतिहास

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. या मतदारसंघातून आबासाहेब निंबाळकर, निकाळजे गुरुजी दोनदा, तर विठ्ठलराव भैलुमे यांनी एकदा काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केले आहे. 2009 साली मतदारसंघ खुला झाला. त्यावेळी बापूसाहेब देशमुख यांचा निसटता पराभव झाला. 2014 ला किरण पाटील यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. पुढे राजकीय तडजोड होत 2019 मध्ये काँग्रेसची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली. रोहित पवार काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सहकार्याने आमदार झाले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची टोलेबाजी

महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला द्यावी. भूमिपुत्रांना न्याय मिळावा. असे न झाल्यास सांगली लोकसभेची पुनरावृत्ती होईल, याचा विचार करावा. अजित पवार बाजूला गेल्याने बारामतीची जागा रिक्त झाली आहे. आता रोहित पवार यांनी बारामतीला परतावे आणि तिथं निवडणूक लढवावी. दक्षिणेत काँग्रेसला एकही जागा नाही कर्जत-जामखेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने ही जागा काँग्रेसलाच मिळावी. पाच वर्षासाठी आम्ही ही जागा रोहित पवार यांना दिली होती. या मतदारसंघात काही प्रमाणात अजितदादांचा प्रभाव आहे. आता अजितदादा बाजूला गेलेत. सहाजिकच मतांची विभागणी होणार आहे. आमचा काँग्रेसचा मतदार तसाच जागेवर आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे आणि तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com