Nana Patole News; काँग्रेसची घाई; अस्तित्वात नसलेली कार्यकारणी बरखास्त?

पदवीधरच्या काँग्रेस अंतर्गत राजकीय वादात नाशिकला होणार झटपट नियुक्त्या तर नगरला बरखास्ती
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

नाशिक: (Nashik) पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या समर्थनार्थ नगरचे (Ahemadnagar) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे (Balasaheb Salunkhe) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने घाई घाईत नगर जिल्हा कार्यकारणीही बरखास्त केली. मात्र असे करताना सध्या जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीची कार्यकारणीच अस्तित्वात नाही, याचा त्यांना विसर पडला. (State congress dismissed nagar district Committee in a hury)

Nana Patole
BJP News; `लव्ह जिहाद` नंतर सुरु झाले `लँड जिहाद`!

दरम्यान नाशिकला जिल्हा व शहर कार्यकारीणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या दिर्घकाळ रखडल्या होत्या. त्यावर ज्येष्ठांनी भरसभेत प्रदेशाध्यक्ष पटोले यांना विचारणा केली. त्यामुळे या नियुक्त्या अगदी सुपरफास्ट गतीने होतील, असे पटोले म्हणाले होते.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक व नगर जिल्ह्यात कार्यकारीणी अस्तित्वात नाही. नुकतीच जिल्हा काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. नवीन कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही.

Nana Patole
Shyam Manav threat : "कल दो बजे तुझे गोली मारूंगा'; 'अंनिस'चे श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी

ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात दिर्घकाळ नाशिकचे प्रभारी राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या संमतीशिवाय नाशिकच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. नगर जिल्ह्यात देखील अशीच स्थिती होती. पदवीधर निवडणुकीतील घडामोडींनी त्यात पक्षांतर्गत वादाला फोडणी दिली. त्याचाच परिणाम म्हणून नगरला अस्तित्वात नसलेली कार्यकारणी प्रदेश काँग्रेसचे संघटन सरचिटणीस प्रमोद मोरे यांच्याकडून बरखास्त करण्याची घटना घडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com