Devendra Fadnavis Politics: दौरा मुख्यमंत्र्यांचा, धास्ती पोलिसांना; नोटीस बजावली काँग्रेसच्या राहुल दिवेंना!

Congress leader Rahul Dive warns CM about river pollution, police becomes active, issues notice-नदी प्रदूषण आणि एसटीपी प्लांट बाबत नागरिकांचा विरोध असल्याने माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला होता इशारा
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Rahul Dive News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. यातील अनेक प्रकल्पांना नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे कुंभमेळ्याआधीच वरून वादाची ठिणगी पडली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकचा दौरा करीत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन होईल. यातील अनेक प्रकल्प सुरू होण्याआधीच चर्चेत आले आहेत.

शहरातील गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदी प्रदूषण हा मुख्य विषय आहे. टाकळी येथे मला निसारण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याला काँग्रेसचे नेते राहुल दिवे आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यांच्याया विधानावरून पोलिस खडबडून जागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Devendra Fadanvis
Kolhapur Election : दक्षिणच्या 'म्होरक्या'साठी काँग्रेसचं चक्रव्यूह, कोल्हापुरातली सर्वात हायहोल्टेज लढत 'या' प्रभागात दिसणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली ठेकेदारांना जास्तीत जास्त फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेचे प्रशासन त्यासाठी सक्रिय आहे. त्यामुळे नदी अच्छेतेसाठी दिलेल्या ठेक्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी केला आहे.

Devendra Fadanvis
BJP Politics: भाजपाने विरोधकांचे मनसुबे उधळले, काँग्रेसचा माजी आमदार भाजपला शरण, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश!

याबाबत त्यांनी बुधवारी नासर्डी नदी येथे स्थानिक नागरिकांसह आंदोलन केले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या मागण्यांची दखल घ्यावी. अन्यथा प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यालाही अडवले जाईल असे म्हटले होते.

समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या या बाईट मुळे पोलीस मात्र चांगलेच अलर्ट झाले. त्यावरून पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी रातोरात माजी नगरसेवक दिवे यांना नोटीस बजावली आहे. याबाबत तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशी सूचनाही त्यांना देण्यात आली.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे अनेक कामे वादाचा विषय आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शंभर मीटर परिसरातील पाडण्यात आलेली घरे आणि बांधकामे यावरून असंतोष आहे. त्यातील मध्यवस्ती भागातील बिडी भालेकर शाळा पाडून तेथे विश्रामगृह बांधण्याचा प्रस्ताव आहे.

सर्व विषयांना स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. बाहेरून आलेल्या आणि नाशिकची कोणती माहिती नसलेल्या अधिकाऱ्यांकडून असे वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत. या विरोधात सातत्याने आंदोलन आणि मागण्या होत आहेत.

सोशल मीडियावरील एका बाईटवरून राजकीय नेत्यांना थेट नोटीस बजावण्याचे काम पोलिसांनी केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. राज्याचे मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री नाशिकला येत असल्याने पोलीस यंत्रणा एवढी अलर्ट झाली.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com