Sharad Aher : काँग्रेस नेते शरद आहेर म्हणाले, "किमान दोन इच्छुकांनी तरी उमेदवारी मागावी"

Sharad Aher Congress Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांना आवाहन
sharad Aher
sharad AherSarkarnama
Published on
Updated on

Nashik Congress News : एकीकडे काँग्रेसची स्वबळाची भाषा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने कार्यकर्त्यांत आत्मविश्वास वाढल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्ष काँग्रेसच्या बैठकीत मात्र वेगळेच चित्र दिसते आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे आज आढावा बैठक झाली. या बैठकीला विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुकीत प्रदेश काँग्रेसकडे नाशिकचे योग्य चित्र गेले पाहिजे.

त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी मेहनत घ्यावी. एका मतदारसंघातून किमान दोन इच्छुकांनी उमेदवारी मागितली पाहिजे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि तालुका कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी केले.

आहेर यांच्या या वक्तव्याने अनेकजण बुचकाळ्यात पडले. एक प्रकारे काँग्रेसची संघटनात्मक आणि निवडणुकीतील मर्यादित ताकदीची कबुलीच मिळाली. एकीकडे राज्यात काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीची भाषा करीत आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांवर दबाव निर्माण करीत आहे. आणि दुसरीकडे जिल्हास्तरावर मात्र नाशिकमध्ये ही स्थिती आहे.

sharad Aher
MNS Politics : '...तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल', नाशिकमधील शिक्षणसंस्थाना इशारा

यावेळी आहेर यांनी 1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. त्या निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या निर्णयाने काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली होती. पक्षाकडे सर्व मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवार नव्हते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून आपण जागरूक राहिले पाहिजे. यंदा महाविकास आघाडी अत्यंत भक्कम आहे. तिन्ही पक्ष एकत्रच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने तशी स्थिती यंदा होणार नाही.

sharad Aher
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांच्या मतदारसंघातील रस्त्यांचा मार्ग झाला मोकळा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगला एकोपा आहे. राज्यात महायुतीच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

जेवढे इच्छुक तयार होतील तेवढी पक्षाची जागावाटपाच्या चर्चेत दावा करण्याची ताकद वाढेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेर यांनी केले. शरद आहेर यांच्या या दाव्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचाही गोंधळ उडाला.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, महिला आघाडीचे अध्यक्षा श्रीमती वंदना पाटील, राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार अनिल आहेर, सुनील आव्हाड, रमेश कहांडोळे, दिगंबर गीते, डॉ सुचेता बच्छाव आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com