Radhakrishna Vikhe Patil News: सात धरणांच्या कुशीत वसलेले नाशिक शहर देखील सध्या पाण्याच्या समस्येने ग्रस्त आहे. पाणी आहे, मात्र नियोजन नाही अशी स्थिती आहे. त्यातच आता राज्य शासनाने स्मार्ट मीटर बसविण्याचे घोषित केले आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच नाशिक शहरात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील पाणीपुरवठाची यंत्रणा कार्यक्षम करण्याच्या सूचना दिल्या. शहरात स्मार्ट मीटर बसवावेत, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांच्या या सूचनेला काँग्रेसच्या नेत्यांनी प्रखर विरोध केला आहे. मंत्री विखे पाटील यांनी नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याची व्यवस्था आणि यंत्रणा माहिती करून घ्यावी. त्यानंतर असे तुघलकी निर्णय घ्यावेत. अन्यथा सामान्य नागरिक त्याला सडेतोड उत्तर देतील, असा इशारा देण्यात आला.
या संदर्भात नाशिक शहर काँग्रेस सेवा दल अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी महापालिकेला इशारा दिला आहे. शहराच्या २०११ च्या जनगणनेनुसार पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हेच नियोजन सध्या २०२५ मध्ये देखील सुरू आहे. परिणामी शहराच्या अनेक भागात नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत.
मावळते आयुक्त अशोक करंजकर यांनी शहरात उपनलिका आणि हातपंप बसविण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पाण्याची स्थिती लक्षात घेऊन अडचणीच्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार होती. मात्र नव्या आयुक्तांनी त्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शहरात पाण्याची समस्या तीव्र आहे.
जलसंपदा विभागाकडून आता नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर बसविण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करता शहरामध्ये कोट्यावधी लोक आणि बाहेरचे भाविक येणार आहेत. त्यांच्यासाठी पाण्याचे नियोजन काय केले जाणार आहे? हा सामान्यांचा प्रश्न आहे.
महापालिकेने केवळ उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विचार करून नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवू नये. शहराच्या अनेक वसाहती आणि भागात नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम महापालिकेचे आहे. त्यात महापालिका अपयशी ठरली आहे. नागरिकांना आधी पिण्याचे पाणी द्या, मग स्मार्ट मीटर बसविण्याचा विचार करा, असा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहराचा विस्तार आणि लोकसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे. त्या दृष्टीने महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा पिण्याचे पाणी मलनिस:रण आणि विविध सुविधांचा बोजबारा उडाला आहे. या संदर्भात सत्ताधारी पक्षाकडूनच दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या कार्यालयात मोठे आंदोलन झाले होते. या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरचा विषय नवाब निर्माण करतो की काय, अशी स्थिती आहे.
----
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.