Taloda APMC Election News: महाविकास आघाडीच्या पॅनेलच्या घोषणेने भाजप दबावात!

Mahavikas Aghadi Panel: तळोदा बाजार समितीत माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शेतकरी पॅनल
Mahavikas Aghadi Panel
Mahavikas Aghadi PanelSarkarnama

Taloda Mahavikas Aghadi panel : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक उमेदवारी अर्जाच्या भाऊगर्दीने बिनविरोध की निवडणूक अशा जर तरच्या फेऱ्यात अडकली आहे. प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळतील तर बिनविरोधची परंपरा टिकेल व तशी तयारी सर्वच पक्षांची असताना मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या साठमारीत महाविकास आघाडीने शेतकरी पॅनल जाहीर करून आघाडी घेतली. त्यामुळे विरोधक दबावाखाली आहेत. (Ex MLA Udesingh Padvi ahead in Panel Formation of APMC)

दरम्यान माजी आमदार उदेसिंग पाडवी (Udesingh Padvi) यांनी आम्ही निवडणुकीसाठी (Election) तयार असल्याचे सूतोवाच करून टाकले आहे. त्यामुळे माघार घेण्याची मुदत अद्याप १५ दिवस असताना त्याआधीच निवडणुकीत दबावतंत्र सुरू झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे काँग्रेसने (Congress) भाजपपुढे (BJP) मोठे आव्हान निर्माण केल्याचे सध्याचे चित्र आहे.

Mahavikas Aghadi Panel
Donald Trump News : कोर्टाच्या कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, 'हे षडयंत्र..; मी थांबणार नाही...'

तळोदा बाजार समितीत आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करून पुढील काळात बाजार समितीचा कारभार आपण पाहणार असल्याचे संकेत दिले आहेत. राजकीय परिस्थितीदेखील भक्कम असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडे स्वतः आमदार राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी अशी भक्कम नेतृत्वाची फळी आहे. त्यात सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदारसंघात त्यांचे प्राबल्य आहे.

दुसरीकडे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील सर्व १८ जागी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही उमेदवारी केली आहे. त्यात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सभासदांनी माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात बैठक घेत महाविकास आघाडी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक बिनविरोधच्या वळणावरून निवडणुकीच्या वळणावर जाते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Mahavikas Aghadi Panel
Nana Patole News: पटोलेंवरुन आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीनेही आळवला नाराजीचा सूर; हायकमांड काय निर्णय घेणार?

शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीदेखील उमेदवारी करून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जर एवढ्या जागा मिळाल्या तर बिनविरोध होईल अन्यथा निवडणूक होईल अशा जर-तरच्या फेऱ्यात बाजार समिती अडकल्याने पुढील काळात कशी पावले पडतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, ६ ते २० एप्रिल अर्ज माघारीची मुदत असल्याने माघारीअंती खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट

बाजार समितीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. तो बाजार समिती पेलू शकेल अशी परिस्थिती नाही. कर्मचाऱ्यांचे वेतनदेखील वेळेवर होत नसल्याची परिस्थिती आहे. अशा बाबींचाही विचार सर्वांनाच करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com