बैठक नागरिकांची; नगरसेवकांची गाऱ्हाणी होर्डींगवर झळकण्याची!

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नागिरकांच्या अडचणींसाठी घेतलेली बैठक नगरसेवकांच्या तक्रारींनी गाजली.
BJP, NCP leaders welcomig CP.
BJP, NCP leaders welcomig CP.Sarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विनंतीवरून पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांनी डीकेनगर भागात बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांनी (NMC) नागरिकांच्या अडचणींएैवजी वेगळीच गाऱ्हानी मांडली. एक नगरसेविका तर, आम्हाला होर्डींग लावण्यासाठी परवानगी कोण देणार?. आम्ही परवानगीसाठी कुठे जायचे? हे गाऱ्हाणे मांडल्याने आयुक्तांनी कपाळाला हात लावला.

BJP, NCP leaders welcomig CP.
आयुक्त पांडे संतापले, चौकीत दारु पिणारे ४ पोलिस सस्पेंड!

पोलिस चौकीत पोलिसांनी केलेल्या दारू पार्टीनंतर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गंगापूर हद्दीतील डीकेनगर पोलिस चौकी परिसरात मोहल्ला कमिटीची बैठक बोलावून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा श्रींगी चौगुले, संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, दीपाली खन्ना, मधुकर गावित, पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, रियाज शेख आदी उपस्थित होते.

BJP, NCP leaders welcomig CP.
चौकीत दारू पार्टी करणाऱ्या पोलिसांची नागरिकांनी उतरवली झींग!

यावेळी नागिरकांनी या भागातील उद्याने, मोकळ्या जागा मद्यपींचे अड्डे झाले आहेत. त्यावर बंदोबस्त करण्याची मागणी अतिशय गांभिर्याने मांडली. एक नगरसेवकाने मात्र या भागात अनेक शिक्षण संस्था आहे. तीथे दिवे देखील नाहीत, असे सांगितले. एक नगरसेविकाने पोलिस चौकीचे भाजी बाजाराजवळ स्थलांतर करावे अशी सूचना केली. त्यानंतर एका नगरसेविकेने चक्क लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमांसाठी होर्डींग्ज लावण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे आमच्या कार्यक्रमांची जनतेला माहिती होईल असे सांगितल्याने आयुक्तांनी हस्तक्षेप करीत, बैठक कशासाठी, सुचना काय येत आहेत, असे सांगत सुचक इशारा दिला.

यावेळी आयुक्त पांडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना रात्रीच्या चुकीच्या प्रकाराबद्दल संबंधितांचे निलंबन केल्याचे जाहीर केले. या वेळी पांडे यांनी सांगितले, की नाशिक शहरात ६५ पोलिस चौक्या आहेत. एका पोलिस चौकीला २० लोकांच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. नाशिक शहरात पोलिस बळ अपुरे असल्याने बऱ्याच ठिकाणी मनुष्यबळ देणे अवघड आहे. शहरातील कित्येक पोलिस चौकी अनधिकृत आहे. नाशिक शहरातील बऱ्याच अनधिकृत पोलिस चौक्यांना पानटपरीचे स्वरूप प्राप्त झाल्याने त्याबाबत आढावा घेऊन शासनास नवीन चौकी मंजुरीसाठी लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येईल. अद्ययावत पोलिस चौकीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

या वेळी माजी नगरसेवक मुन्ना हिरे, हिमगिरी आडके, स्वाती भामरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाट, रमेश जाधव, बापू शिंदे, सचिन दीक्षित, सुरेंद्र गुजराथी, सुनील गुजराथी, बांदोर्डे, बंडू सोनवणे, मकरंद देव आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com