IPS Sandeep karnik: दारू आणि मटणाची हाव पोलिसांना नडली, आयुक्त संदीप कर्णीक यांनी थेट घरीच पाठवले!

CP Sandeep karnik;Commissio7ner Karnik gave a stern message to the police, the culprits Police sacked -कैद्यांबरोबर हॉटेलात दारू आणि मटणाचे आमिष पोलिस आयुक्तांच्या कठोर निर्णयाने पोलिसांना चांगलेच महागात पडले.
IPS Sandeep Karnik
IPS Sandeep KarnikSarkarnama
Published on
Updated on

IPS Sandeep karnik: गेले काही दिवस नाशिक शहर गुन्हेगारीने चर्चेत आले आहे. खून आणि गुन्हेगारांचे वर्चस्व यातून सतत शहर वेठीस धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक एक कठोर संदेश देण्यात यशस्वी झाले आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांना जर बसावी म्हणून विविध प्रयोग केले आहेत. थेट जनतेशी संवाद साधण्याचा सूचना त्यांनी पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिल्या. एवढ्यावर न थांबता त्यांनी स्वतः नागरिकांत जाऊन हा उपक्रम चर्चेत आणला.

मात्र नाशिकच्या पोलिस दलातील काहींना हे पचनी पडले नसावे. त्यामुळेच पोलिसांना शिस्तीचे धडे देण्यासाठी आता काम करण्याची वेळ आली आहे. संदर्भात आयुक्त करणे यांनी अतिशय कठोर संदेश पोलिसांना दिला आहे. शिस्त आणि कायदा मोडल्यास थेट घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतल्याने आयुक्त चांगलेच चर्चेत आले आहे.

नासिक रोड येथील खुनाच्या गुन्ह्यातील सोनू उर्फ प्रफुल्ल विजय पाटील आणि कुंदन अरविंद घडे या दोन आरोपींची पोलिसांनी बडदास्त ठेवली होती. त्यांची हॉटेलमध्ये चांगलीच सरबराई करण्यात आली. त्यात हे पोलीस देखील सहभागी झाले. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

पोलिस हवालदार पदमसिंग हटेसिंग राऊळ, शिपाई विकी रवींद्र चव्हाण आणि दीपक जठार या तीन पोलिसांच्या पथकाने आरोपींना न्यायालयात हजर करायचे होते. या कामात त्यांनी मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला. कैदी पार्टी म्हणून काम करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी असे काम केले की, आता त्यांनाच कैद होण्याची वेळ आली आहे.

न्यायालयातून कारागृहात नेताना संबंधित पोलिसांनी आपली खाजगी गाडी या कैद्यांसाठी उपलब्ध केली. कैद्यांना हॉटेलमध्ये नेऊन दारू आणि मटण उपलब्ध करून दिले. त्या पार्टीत पोलीसही सहभागी झाले. विशेष म्हणजे पोलीस शिपाई विकी चव्हाण यांनी त्याचे बिल दिले.

यावेळी हॉटेलमध्येच कोणीतरी या कैद्यांसमवेत पोलिसांचा फोटो काढला. तो थेट आयुक्तांना पाठविला. पोलिस आयुक्त कर्णिक यांनी त्यावर तातडीने कारवाई करीत चौकशीचे आदेश दिले होते. आता याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित कैदी पार्टीच्या तिन्ही पोलिसांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळेआयुक्तांच्या या निर्णयाचे नागरिकांमध्ये स्वागत होत आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com