महसूल कार्यालयावर आज `लाल वादळ` घोंगावणार!

माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासींचे आज धरणे आंदोलन.
J. P. Gavit
J. P. GavitSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिक (Nashik) ते मुंबई लाँग मार्च काढल्याने चर्चेत आलेल्या वनजमिनींचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यासंदर्भात आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (CPM) माजी आमदार जे. पी. गावित (J. P. Gavit) यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी विभागीय महसूल कार्यालयापुढे धरणे धरतील. या लाल वादळाची प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली आहे. (Trible forest land issue became a major issue)

J. P. Gavit
राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंची नाराजी कायम; मतदान काही तासांवर तरीही मुंबईत पोचले नाहीत!

वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, वनजमिनीचे चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरविलेले दावे तत्काळ पात्र करावेत यांसह विविध प्रश्नांच्या बाबतीत आदिवासींवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सोमवारी विभागीय महसूल कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व नाशिक जिल्हा किसान सभेतर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन होईल. जिल्हाभरातून आदिवासी बांधव त्यासाठी येथे दाखल होतील.

J. P. Gavit
Vidhan Parishad Election 2022 Live : उमा खापरे यांना पडलेल्या एका मतावर आक्षेप...

यासंदर्भात श्री. गावित म्हणाले, की वनाधिकार काद्याची अंमलबजावणी १६ वर्षापासून सुरू आहे. परंतु सरकारने चुकीच्या पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो पात्र दावे अपात्र करण्यात आले. ज्याचे दावे पात्र झाले, त्यांना वनाधिकार कायद्यानुसार त्यांच्या ताब्यातील चार हेक्टर वनजमीन मंजूर झाली नाही. त्यांना एक गुंठा, दोन गुंठा जास्तीत जास्त दोन एकरपर्यंत जमीन मंजूर केली आहे. फॉरेस्ट प्लॉटधारकांची मागणी असताना सात-बारा उताऱ्यांवर त्यांचे नाव कब्जेदार म्हणून न लावता इतर हक्कात लावले आहे. एकाच सात-बारावर शेकडो प्लॉटधारकांची नावे टाकली आहेत.

ते पुढे म्हणाले, जमीन कसून त्यावर पिके काढून प्लॉटधारक उपजिविका करतात. मात्र सात-बारा उताऱ्यावर मात्र सदर जमीन पोटखराबा म्हणून दाखविण्यात आली आहे. वनाधिकार कायदा फॉरेस्ट प्लॉटधारकांच्या बाजूने असताना दुसरीकडे फॉरेस्ट खात्याचे लोक प्लॉटमध्ये चाऱ्या करणे, खड्डे खोदणे, बांधलेली घरे तोडणे, कच्च्या व पक्क्या विहिरी तोडत आहेत. त्याचप्रमाणे नाशिक व ठाणे-पालघर जिल्ह्यातील नार-पार, दमणगंगा, वाघ, पिंजाळ या पश्चिम वाहिनी नद्यांवर धरणे बांधून अडवलेले पाणी कालव्याद्वारे स्थानिक आदिवासींना विस्थापीत केले जात आहेत.

सिंचनाच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणावर त्यांनी टिका केली. ते म्हणाले, नार-पार, दमणगंगा नर्मदा या नद्यांचे पाणी नद्या प्रकल्प गुजरात, मुंबईला नेऊन स्थानिक आदिवासींना विस्थापित करणारा प्रकल्प तत्काळ रद्द करावेत. पश्चिम वाहिनी नद्या-नाल्यावर गुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वरमध्ये ७७ लघुपाटबंधारे योजना मंजूर कराव्यात, यासाठी मोर्चा निघणार आहे.

ज्येष्ठ नेते डॉ. डी. एल. कराड, सुभाष चौधरी, रामजी गावित, भिका राठोड, सावळीराम पवार, उत्तम कडू, मंदाकिनी भोये, इंद्रजित गावित, मनीषा महाले, मोहन जाधव, विजय घांगळे, किसन गुजर, सुनील मालुसरे, विजय पाटील यांनी मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com