Manikrao Kokate politics: शेतकऱ्यांत खळबळ, नाशिकमध्येही बोगस पिक विम्याबाबत कारवाई सुरू

Crop insurance; Dhananjay Munde, action against bogus crop insurance in Nasik-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे करणार यापूर्वीच्या कारभाऱ्यांच्या कार्यकाळातील कृषि विभागातील कामकाजाची साफसफाई
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Crop insurance scam: राज्यभरात सध्या बोगस पिक विमा प्रकरण गाजत आहे. जिल्ह्यात अशी प्रकरणं आढळल्याने त्याचा विस्तार जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आहे. आता यामध्ये नाशिकचा ही समावेश झाला आहे.

राज्यात सुमारे साडेचार लाख बोगस पिक विमा प्रकरणे आढळली होती. यामध्ये सर्वाधिक एक लाख २४ हजार प्रकरणे एकट्या बीड जिल्ह्यात आढळली. विशेष म्हणजे हा जिल्हा तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री असलेला जिल्हा आहे.

Manikrao Kokate
Valmik Karad: वाल्मिक कराडची परदेशातही ‘माया’?, सीआयडी, एसआयटीकडून शोध!

या संदर्भात आता नाशिक मध्ये बोगस पिक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत आज कृषी उपसंचालक जगदीश सोनवणे यांनी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना केले आहेत. त्यानुसार बोगस पिक विम्याच्या प्रकरणांचा शोध सुरू झाला आहे.

Manikrao Kokate
Eknath Shinde Politics: तिढा `पालकत्वा`चा: भाजप यावेळीही एकनाथ शिंदेंना `जमिनी`वर आणणार?

नाशिक मध्ये सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांनी बोगस विमा काढल्याचे आढळले आहे. यासंदर्भात संबंधित प्रकरणे रद्द करण्यात येणार आहेत. याबाबत शासनाने आपल्या तिजोरीतून भरलेला हप्ता विमा कंपनीकडून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा अशी योजना यापूर्वी सुरू केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला यामध्ये शेतकऱ्यांना अवघा एक रुपया भरावा लागत असल्याने विमा काढण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्याचा फायदा काही बोगस एजंट आणि शेतकऱ्यांनी घेतला आहे.

यामध्ये नापीक तसेच कोणतेही पीक नसलेल्या जमिनीवर देखील पीक दाखवून विमा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांकडून एक रुपया अदा केला जात असला तरीही शासनाकडून उर्वरित सुमारे दहा हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीला वर्ग केला जात होता. त्यामुळे यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे आढळले आहे.

नाशिक जिल्ह्यात देखील हे लोन पसरले आहे. यापूर्वीच्या कृषिमंत्र्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या या कामकाजाची आता तपासणी सुरू झाली आहे. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण देखील होत आहे. विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यापर्यंत या तक्रारी केल्या आहेत.

राज्याच्या कृषी आयुक्तांनी यापूर्वीच यासंदर्भात एक अहवाल कृषी मंत्रालयाला सादर केला आहे. त्यानुसार पुढील कारवाई होणार आहे. यामध्ये मावळत्या कृषी मंत्र्यांच्या कारकिर्दीतील पिक विम्याची साफसफाई सध्याच्या कृषी मंत्र्यांना करावी लागणार आहे. पीक विम्याचे प्रकरण चर्चेत असतानाच या विभागात अन्य कोणते घोटाळे तर झाले नाही ना, याचीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

या निमित्ताने विरोधकांना आयताच विषय मिळाला आहे. विशेषतः बीडचे आमदार सुरेश धस यांनी याबाबत कृषी विभागावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे बोगस पीक विम्याचे प्रकरण चर्चेत आले आहे. नाशिकमध्ये आजपासून त्याची झाडाझडती सुरू झाली.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com