मधुकर पिचड अडचणीत, मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करून मालमत्ता हडप केल्याची तक्रार!

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Madhukar Pichad
Madhukar PichadSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यासंदर्भात सुनेने त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. श्री. पिचड यांनी स्वतःच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केले, माझा देखील छळ केला. त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे श्री. पिचड यांसह त्यांच्या कुटुबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Madhukar Pichad
देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर संतापले, म्हणाले, `त्यांना लाज वाटली पाहिजे`

यासंदर्भात श्री. पिचड यांच्या स्नुषा राजश्री किरण देशमुख (पिचड) यांनी आपले वकिल अॅड उमेश वालझाडे यांच्या मार्फत शहरातील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भिवंडी (ठाणे) येथील कौटुंबिक वाद तसेच संपत्तीचा वाद आहे. याबाबत मधुकर काशीनाथ देशमुख (पिचड)जगदीश किरण देशमुख (पिचड), कमलबाई मधुकरराव देशमुख, सौ. अश्विनी रणजीत दरेकर, रणजीत चंद्रकांत दरेकर यांच्या विरोधात कलम ४९८ अ, ४०६, ३०६, ३२४, ५०४, ५०६, ४६७, ४६८, ४७१ आदी कलमांन्वये ३० नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Madhukar Pichad
`इतनी अंधेरी न थी रात, पहले लिख’

तक्रारीत म्हटले आहे की, सौ. राजश्री या सासरी नांदत होत्या. यावेळी त्यांचे पती हे दारू तसेच मुलींवर पैसे उडवायचे. रात्री बेरात्री घरी यायचे. त्यांना काही विचारल्यास किंवा त्याबाबत बोलल्यास पती-पत्नी दरम्यान भांडण होत असे. घरातील मंडळी याबाबत आपल्या पतीला प्रोत्साहन देत असत. फिर्यादीला घरात मोलकरणीसारखी वागणूक देत असत. मानसिक व शारीरीक छळ करीत असत. आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करीत असत. आपल्या वडिलांबाबत अपशब्द वापरून मानसिक छळ होत असे. या दरम्यान घरातील मंडळींनी राजश्री यांचे पती किरण देशमुख (पिचड) यांना विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यांच्या मालकिची दिड कोटी रुपयांची बालाजी वेव्हरेजेस कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून व कंपनीच्या नावात बदल करून सुनेचे सर्व हक्क संपवले. पतीचे दागीने, पॅालिसी व ठेवी देखील काढून घेतल्या. आता आपल्या जीवाला देखील धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याविषयी दिवानी न्यायालयात २०१९ मध्ये याचिका करण्यात आली आहे. तसेच सौ. राजश्री यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com