दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती न दिल्यास सरकारची दिवाळी कडू

लासलगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक झाली.
Raju Shetty, Awabhimani Shetkari Sanghtna
Raju Shetty, Awabhimani Shetkari SanghtnaSarkarnama
Published on
Updated on

लासलगाव : शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त न केल्यास शासनाची दिवाळी कडू करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे (Swabhimani Shetkari sanghtna) देण्यात आला आहे. लासलगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक झाली. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली.

Raju Shetty, Awabhimani Shetkari Sanghtna
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अमरीशभाईंच्या जाळ्यात अडकली?

शासनाने कर्जमुक्ती यादीमध्ये उर्वरित रक्कम भरूनही शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची कर्जमुक्ती मिळाली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी नाही झाली तर शासनाची दिवाळी कडू केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख श्रावण देवरे यांनी दिला. निवडणुकीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना वीजबिल माफ करू असे आश्वासन दिले. दुसरीकडे शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे काम जोरात चालू आहे. वीज कनेक्शन तोडणे बंद करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून ऊर्जामंत्री यांचा पुतळा दहन करण्यात येईल असे जिल्हाप्रमुख राजू शिरसाठ यांनी सांगितले.

Raju Shetty, Awabhimani Shetkari Sanghtna
अशोक चव्हाण, थोरातांना जमेना, ते नाना पटोलेंनी करून दाखवले!

आधी पुढाऱ्यांच्या जमिनी पहा

केंद्र सरकारने एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे विरोधात आहे. जिल्ह्यातील जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची जमीन लिलाव चालू आहे, यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निफाड तालुकाध्यक्ष राम राजोळे यांनी सांगितले की, आधी संचालकांच्या जमिनीचे लिलाव करा, त्यांनीही कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून कर्ज घेतले आहे, मग शेतकऱ्यांच्या जमीनीला हात लावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहाणार नाही.

...तर बाजर समितीत आंदोलन

मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, शेतकऱ्यांच्या मालाचे खुले लिलाव केले जातात, परंतु खळ्यावर गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाचे वांधे काढले जातात. भाव कमी केला जातो. वजन कमी दाखविले जाते. शेतकऱ्यांना अरेरावी केली जाते. शेतकऱ्यांचे काटे मारले जातात. यावर निफाड तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर यांनी लासलगाव बाजारसमितीचे सचिव यांना निवेदन देऊन यासंदर्भात कल्पना देण्यात आली. या प्रकारात बदल न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना बाजार समितीत तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ बोराडे, जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, श्रावण देवरे, रवी शेवाळे, कृष्णा जाधव, राम राजोळे, गजानन घोटेकर, रवींद्र तळेकर, मच्छिंद्र जाधव, संजय जाधव, ज्ञानेश्वर नरोडे, विठ्ठल जाधव, शरद शिलावर आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com