राज ठाकरेंना भिडणारे दीपक पांडे आता मुंबई शहरात आले!

नाशिक शहर पोलिस आयुक्तपदी नाईकनवरे यांची नियुक्ती झाली.
Deepak Pandey Latest News Updates
Deepak Pandey Latest News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : पोलिस (Police) आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था (Law & Order) अबाधित राखण्याच्या उद्देशाने आणि सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) घालून दिलेले नियम पाळले जावेत, यासाठी शहर हद्दीसाठी भोंगेंबाबत नियमावली काढत सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्याबाबत परवानगी अनिवार्य केली होती. यातून त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या राजकारणाला चाप लावला होता. त्या पांडेंची आता मुंबई शहरात बदली झाली आहे. (Deepak Pandey Latest News Updates)

Deepak Pandey Latest News Updates
रावेरला उघड झाला दीड कोटींचा ‘टॉयलेट घोटाळा’

गृह विभागातर्फे बुधवारी राज्यातील १४ विशेष पोलिस उपमहानिरीक्षक यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती देत नियुक्ती देण्यात आली. त्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नाशिक शहर पोलिस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.

Deepak Pandey Latest News Updates
शिक्षण विभाग बदनाम; आधी लाचखोरी आता महिलेवर अत्याचार?

महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईत महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली.

नाशिकचे मावळते पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईमध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली. यांसह नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरिक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनादेखील विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. श्री. नाईकनवरे यांनी सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे.

मावळते पोलिस आयुक्त पांडे यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या बदलीनंतर नाशिकच्या आयुक्तपदाचा पदभार घेतला होता. कोरोनाकाळात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वास्थासाठी विशेष उपक्रम राबविले. त्यानंतर शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने हेल्मेटसक्ती, कोरोनाकाळात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’, हेल्मेटशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशास निर्बंध, असे विविध उपक्रम राबविले होते. दरम्यान, आयुक्त पांडे यांनी मार्चमध्ये शासनाकडे खासगी कारणास्तव विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जानुसार त्यांची विनंती मान्य झाली असून, त्यांची मुंबईला बदली झाली आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांवर विनापरवानगी मोर्चे, आंदोलन, कार्यक्रम आयोजित केल्यास गुन्हे दाखल झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी होती. तसेच मार्चमध्ये त्यांनी महसूल विभागातील अधिकारी आरडीएक्स आणि डिटोनेटर असल्याचे सांगत त्यांच्याकडील अधिकार कमी करत ते पोलिस आयुक्तांना देण्यात यावे, असा लेटरबाँब टाकून संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून दिली होती. यानंतर राज्यात महसूल अधिकारी यांच्याकडून याचा निषेध नोंदविण्यात येऊन निदर्शने करण्यात आली होती. तसेच पोलिस आयुक्तांनी महसूल विभागाची माफी मागावी आणि त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्याची मागणीही केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही श्री. पांडे यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. श्री. पांडे यांनी महसूलमंत्र्यांची माफी मागत मी माझ्यावर पत्रावर ठाम असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्यांच्याविरुद्ध महसूल अधिकाऱ्यांमध्ये रोष वाढला होता.

भोंग्यांबाबत मार्गदर्शक भूमिका

राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंगे ३ मेपर्यंत न काढल्यास त्यासमोर हनुमान चालिसा मोठ्या आवाजात वाजविली जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळले जावेत, यासाठी शहर हद्दीसाठी भोंगेंबाबत नियमावली काढत सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्याबाबत परवानगी अनिवार्य केली होती. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. गृह विभागाकडून देखील याची दखल घेतली होती.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com