Devendra fadnavis Politics: फडणवीसांच्या बाउन्सरने अजित पवार, एकनाथ शिंदेंचे स्वप्न भंगले?

Devendra Fadnavis; Did CM Fadnavis increase or resolve the complexity of the Guardian Minister post?-नाशिकच्या पालकमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय ट्विस्ट ने एका दगडात दोन पक्षी.
Eaknath_Shinde, Devendra_Fadanvis, Ajit_pawar
Eaknath_Shinde, Devendra_Fadanvis, Ajit_pawarSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात कौटुंबिक सोहळा आणि सिंहस्थ कुंभमेळा हा मुख्य विषय होता. मात्र या निमित्ताने रखडलेला पालकमंत्री पदाचा प्रश्न चर्चेला येणारच होता. त्यावर ते सहकाऱ्यांना सुचक इशारा देण्यात यशस्वी झाले आहेत.

आगामी सिंहस्थाबाबत आखाडा परिषदेचा गुंता आहे. त्यामुळे साधूंचे आखाडे आणि आखाडा परिषद यामध्ये वाद कसा सोडवायचा हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला होता. मंत्र्यांनी सर्व तेराही आखाड्यांच्या प्रमुखांना गोंजारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मार्गी लावला. त्यामुळे प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे

Eaknath_Shinde, Devendra_Fadanvis, Ajit_pawar
Dhule cash controversy: एकनाथ शिंदेच्या आमदाराच्या त्या ‘पीए’च्या खोलीत सापडले फायलींचे घबाड! काय आहे प्रकरण?

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा आणि त्या निमित्ताने होणारी विकास कामे यावर या बैठकीत सादरीकरण झाले. स्वच्छता आणि शहरातील विकासकामे यावर सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. हा सिंहस्थासाठी महत्त्वाचा विषय आहे तसाच तो राजकीय विषय देखील आहे. त्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला.

Eaknath_Shinde, Devendra_Fadanvis, Ajit_pawar
ShivSenaUBT vs BJP : संजय राऊतांची पाठ फिरताच, मंत्री महाजनांची शिवसेना ठाकरे सेनेत 'भूंकप' घडवण्याची भाषा

त्यामुळे कुंभमेळ्याची बैठक झाली. मात्र पालकमंत्र्यांची घोषणा अद्याप झालेली नाही. महायुती सरकारच्या तीन्ही राजकीय पक्ष आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. सगळ्यांनाच त्याबाबत उत्सुकता असताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय चुटकीसरशी उडवून लावला आहे.

पालकमंत्र्यांची घोषणा केव्हा होणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्र्यांच्या घोषणे वाचून अडले तरी काय? असा प्रतिप्रश्न केला. पालकमंत्री नसल्याने अनेक निर्णय अडचणीत आले आहेत, हे वास्तव आहे. तसं नाही निर्णय घेताना समस्यांना सामोरे जावे लागते. त्या दृष्टीने पालकमंत्री कोण? आणि त्यांची नियुक्ती केव्हा होणार हा महत्त्वाचा प्रश्न होता.

महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा गंभीर बनला आहे. नाशिकला गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली होती. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने त्याला तीव्र आक्षेप घेतल्याने ते नियुक्ती लगेचच रद्द झाली होती. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. मात्र एकही मंत्री नाही. त्यामुळे आमदारांची नाराजी लपून राहिलेली नाही. युती आणि आघाडीचे राजकारण करताना भाजपने स्वपक्षाच्या आमदारांवरच अन्याय केला आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यात देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि डॉ राहुल आहेर हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. मात्र त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण जाहीर होणे अपेक्षित होते. तर त्याची घोषणा झाली नाही. प्राधिकरणाच्या निमित्ताने सिंहस्थाची सर्व विकासकामे आणि निविदा प्राधिकरण हाताळणार आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाच्या राजकीय वादावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय कौशल्याने राजकीय उपाय केल्याचे संकेत आहेत. त्यात दोन्ही सहकारी पक्षांना आणि उपमुख्यमंत्र्यांना हा सूचक इशारा मानला जातो.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com