नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर आज केदारनाथ येथे आद्य शंकराचार्यांच्या समाधी व मूर्तीचे अनावरण होणार आहे. यानिमित्ताने भाजपातर्फे देशभर ८२ तीर्थक्षेत्री कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी राज्यातील नऊ तीर्थस्थळी राज्यातील भाजपचे नेते देवदर्शन व कार्यक्रम करणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम येथे झालेल्या २०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन तसेच २०० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. या निमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना व १२ ज्योतिर्लिंग अशा देशातील ८२ तीर्थक्षेत्री भाजपतर्फे कार्यक्रम होणार आहेत.
या निमित्ताने राज्यात त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर , भीमाशंकर , परळी वैजनाथ , औंढा नागनाथ तसेच पंढरपूर , माहूर , कोल्हापूर , तुळजापूर येथे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपा नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली. यावेळी भजन, नाम संकीर्तन, आरती, साधू महंतांचा सत्कार असे कार्यक्रम होतील.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, घृष्णेश्वर येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार डॉ. भागवत कराड, विजयाताई रहाटकर, भीमाशंकर (पुणे) येथे माजी मंत्री संजय भेगडे, कोल्हापूर येथील जगद्गुरू शंकराचार्य मठात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माहूर येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, व्यंकटराव गोजेगावकर, पंढरपूर येथे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान अवताडे, आमदार प्रशांत परिचारक, परळी वैजनाथ- राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, औंढा नागनाथ - आमदार तान्हाजी मुटकुळे, गजानन घुगे, रेणुकादास देशमुख, तुळजापूर येथे आमदार राणा जगजितसिंग पाटील, नितीन काळे. अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.