Bhujbal News; भुजबळांच्या नातींची सोनेरी कामगिरी, भारतासाठी जिंकले गोल्ड!

इंग्लड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींना सुवर्ण पदक
devisha & Tanishqa Bhujbal
devisha & Tanishqa BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) केंट (इंग्लंड) शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप २०२३’ (Sports) या आंतरराष्ट्रीय (International) धनुर्विद्या स्पर्धेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या दोन्ही नाती देविशा (Devisha) व तनिष्का (Tanishqa) पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांनी सुवर्ण कामगिरी केली. त्यांनी भारताला सुवर्ण पदक (Gold Medal) मिळवून दिले आहे. (Devisha & Tanishqa Bhubal bags Gold in archery at Kent (england) championship)

devisha & Tanishqa Bhujbal
Dhule News; शेतकऱ्यांनी केली खासदार डॉ. सुभाष भामरेंची कोंडी?

देविशा आणि तनिष्का या माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या आहेत. त्यांनी चमकदार कामगिरी करीत भारतासाठी सुवर्ण पदक मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

devisha & Tanishqa Bhujbal
Dr. Bharti Pawar: तुम्ही चुकीची माहिती देता अन् आंदोलन माझ्या विरोधात होते!

कु. देविशा व कु. तनिष्का या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमईटी, मुंबई संस्थेच्या विद्यार्थीनी आहेत. इंग्लडच्या मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे १३ ते १८ फेब्रुवारी मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ३८ देशातील ५६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत भारताचे १२ स्पर्धक विविध वयोगटात आणि वेगवेगळ्या धनुष्य प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेत देविशा पंकज भुजबळ हिने १९ वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्का पंकज भुजबळ हिने १७ वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात १ सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्जवल केले आहे. भारतीय संघ हा फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता.

या स्पर्धेचे उदघाटन मिडवे केंट च्या महापौर सौ. जेन अल्डोस आणि श्री टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव मुरे यांच्या उपस्थितीत पार पडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com