आरोप, प्रत्यारोप नव्हे, विकासाचे राजकारण करतो

नवापूर येथील जगन्नाथ महादेव मंदिरासाठी ९७ लाखाचा निधी मंजूर केल्याची माहिती नाईक यांनी दिली.
MLA Shirishkumar Naik
MLA Shirishkumar NaikSarkarnama
Published on
Updated on

नवापूर : मी आरोप प्रति आरोप करणारा नसून काम करणारा आमदार आहे. शहर विकासाचा (Devolopment) ध्यास नेहमीच ठेवला आहे. बोलण्यापेक्षा कामाला प्राधान्य देतो. नवापूर (Navapur) शहरासह मतदारसंघाचा विकास हेच व्हीजन आहे, असे आमदार शिरीषकुमार नाईक (Shirishkumat Naik) यांनी सांगितले.

MLA Shirishkumar Naik
चाके असती तर भाजपने महापालिकाही घरी नेली असती!

नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी अहिल्याबाई होळकरपासून असलेले जगन्नाथ महादेवाचे मंदिर प्रभाग सातमध्ये आहे. या मंदिराचे काम होण्यासाठी माझे मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, ते आज महादेवाच्या कृपेने मंजूर झाले आहे. याचा मला विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MLA Shirishkumar Naik
`या` प्रभागाच्या निवडणुकीत आमदार देवयानी फऱांदे आणि वसंत गितेंची प्रतिष्ठा पणाला!

या मंदिर परिसरात संरक्षण भिंत बनविणे, मंदिर परिसरात सुशोभीकरण कामासाठी आमदार नाईक यांनी निधी मंजूर करून दिला. या कामाचा शुभारंभ महादेवाची पूजा करून आमदार नाईक यांच्या हस्ते झाला. नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्याकडे त्यांनी याबाबतचे आदेशपत्र दिले.

आमदार नाईक म्हणाले, आदिवासी विकास विभागाचे मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी नवापूर तालुक्यासाठी ११ कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे. यातून ९७ लाखांचा निधी महादेव मंदिर सुशोभीकरणासाठी देत आहे. याची निविदा नगराध्यक्षांनी काढून कामाला सुरवात करावी. आमदार निधीमधून श्री स्वामी समर्थ मंदिराला पण निधी दिला आहे. त्याचे काम ही लवकरच सुरू होणार आहे. नवापूर शहरातील प्रत्येक वॉर्डासाठी लाइटची सुविधा केली आहे. यासाठी दोन कोटी मंजूर झाले असून या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. मंदिराला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिराचे ट्रस्टी यांनी आमदार नाईक यांचा सत्कार केला.

यावेळी उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया, प्रभाग सातच्या नगरसेविका अरुणा पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील, नगरसेवक विशाल सांगळे, दर्शन पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, उद्योजक रमेश अग्रवाल, हरीश पाटील, गणेश वडनेरे, सुभाष कुंभार, उज्ज्वला वडनेरे, विनय गावित, मंदिराचे पुजारी तुळशीराम गुरव, दर्शन पाटील, सुनील पवार, अमित पंचाल, मनोहरलाल, दलाल, शिरीष शहा, प्रवीण ब्रम्हे यशवंत पाटील, विनायक पाटील, धाकू भोई आदी उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com