भाविक म्हणतात, काहे का आदेश, छठपूजा तो होती!, नाशिकचे चित्र!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला प्रशासनाच्या विरोधानंतरही गंगाघाटावर छठपूजा झाली.
Devotees performing Chhatpuja
Devotees performing ChhatpujaSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्य प्रशासनाने आदेश देऊनही बुधवारी उत्तर भारतीयांची गंगाघाटावर छठपूजेसाठी मोठी गर्दी उसळली होती. रामकुंड, गांधीतलाव भागात पूजेस विरोध झाला. तरीही छठपूजा झालीच, अर्थात गोदावरीतिरी नाशिकमध्ये. भाविक म्हणाले, `काहे का आदेश भाई. पूजा के लिए कोई आदेश होता है क्या`

Devotees performing Chhatpuja
`मनसे` म्हणते, साहित्य संमेलन गीतात स्वा. सावरकरांचा उल्लेख का नाही?

बुधवारी अनेक महिलांनी गाडगे महाराज पुलाच्या खालील बाजूस छटपूजा करत मावळत्या सूर्यादेवाला अर्घ्य दिले. पोलिस प्रशासनाने ताठर भूमिका न घेता लवकर पूजा आवरण्याचा सल्ला देत कटुता टाळली. मात्र, रामकुंड परिसरात पूजेस मज्जाव करण्यात आल्याने अनेकांना नदीच्या खालच्या घाटांवर येत पूजाविधी पार पाडला.

Devotees performing Chhatpuja
पालकमंत्री भुजबळ- आमदार कांदे वादामुळे बैठक नाशिकला अन् निर्णय होणार मुंबईला!

कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली नाही, त्यातच तिसऱ्या लाटेच्या भीतीने राज्य प्रशासनाने गतवर्षीसारखीच यंदाही छठपूजेस परवानगी नाकारली होती. त्यासाठी पंचवटी पोलिसांनी मालेगाव स्टॅन्ड, कपालेश्‍वर मंदिराच्या मागील बाजूस तात्पुरते बॅरीकेटींगही उभारले होते. मात्र, अनेक उत्तर भारतीय महिलांनी नाव दरवाजामार्गे गंगाघाट गाठत छठपूजा केली. या वेळी नवविवाहित उत्तर भारतीय तरुणींनी पतीसमवेत सेल्फी घेत पहिल्या छठपूजेचा आनंदही घेतला. या वेळी पोलिसांनी ताठर भूमिका न घेता लवकर पूजा करण्याचा सल्ला उपस्थित महिलांना दिला.

सातपूर, अंबड भागात कृत्रिम तलाव

सातपूरसह अंबड औद्योगिक वसाहतीच्या परिसरात उत्तर भारतीय मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. याशिवाय सिडकोतही या वर्गाची मोठी संख्या आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील बहुसंख्य महिलांनी आपल्या घराजवळच बनविलेल्या कृत्रिम तलावात छठपूजा केली. तरीही या भागातील अनेक महिला पतीसह सायंकाळी मोठ्या संख्येने गंगाघाटावर दाखल झाल्या होत्या.

पूजेची आज समाप्ती

दिवाळीनंतर चार दिवस चालणाऱ्या उत्तर भारतीयांच्या छठपूजा अर्थात षष्ठी पूजेची परंपरा व महत्त्व सांगणाऱ्या अनेक पुरातन कथा प्रचलित आहेत. बांबूच्या टोपलीत पूजेची सामग्री ठेवल्यावर सूर्याला अर्घ्य देताना सर्व प्रसाद सुपात ठेवला जातो. सुपात दिवा लावला जातो. नंतर नदीच्या पाण्यात उतरून सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे. चौथ्या दिवशी अर्थात कार्तिक शुक्ल सप्तमीला प्रात:काली उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते. अर्घ्य दिल्यावर व्रतकर्ते कच्चे दूध व प्रसाद खाऊन व्रत पूर्ण करतात. दरम्यान, पूजेची गुरुवारी (ता.११) समाप्ती झाली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com