Kolhapur Congress: संतप्त महिला काँग्रेसने गाठले पोलीस ठाणे, भाजप नेते महाडिकांच्या अटकेची मागणी!

Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana at Kolhapur: भाजप नेते, खसादार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून महिलांमध्ये संताप
Congress Womens wing & Dhananjay Mahadik
Congress Womens wing & Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: भाजप नेते खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या विधानाचे पडसाद नाशिकलाही उमटले. काँग्रेस महिला आघाडीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. खासदार महाडिक यांना अटक करण्याची मागणी केली.

भाजप नेते खासदार महाडिक यांनी भाजपच्या प्रचार सभेत कोल्हापूर येथे महिलांविषयी केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. नाशिक शहरात महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात खासदार महाडिक यांचा निषेध केला आहे. खासदार महाडिक यांना अटक करण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात आक्रमक रूप धारण केले.

Congress Womens wing & Dhananjay Mahadik
Rohini Khadse : रोहिणी खडसेंनी विरोधकांना खडसावले, "नाथाभाऊंकडे कसला हिशेब मागता"

खासदार महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेविषयी ज्या महिला पंधराशे रुपये अनुदान घेतात, त्यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमांना जाऊ नये. अशा महिला काँग्रेसच्या प्रचार फेरीत दिसल्यास त्यांचे फोटो काढा. त्यांची नावे मला कळवा. मी त्यांचा बंदोबस्त करीन, असा धमकावणी वजा इशारा दिला होता. त्यावर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

Congress Womens wing & Dhananjay Mahadik
Nirmala Gavit : आमदार खोसकर यांनी इगतपुरीचे नाव देशभर बदनाम केले!

यासंदर्भात अखिल भारतीय महिला काँग्रेसचे अध्यक्ष अलका लांबा आणि महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्याशी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क केला. खासदार महाडिक यांच्यावर गंभीर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. ललिता खांडवी, शितल महाजन, अरुणा खैरनार, सुरेखा पगार, सुरेखा कुलकर्णी, निर्मला काळे, सुमन महाले, अश्विनी बाविस्कर, अश्विनी झोपाळे या महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार अर्ज दिला.

यावेळी पोलीस निरीक्षकांची चर्चा करून महिलांचा अवमान करणाऱ्या खासदार महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. यात चालढकल केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने लाडकी बहीण योजना राबविली आहे. ती एक शासकीय योजना आहे. मात्र भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे मंत्री जणू काही आपल्या खिशातून त्यासाठी पैसे देत आहेत, असा अविर्भाव आणत आहेत.

प्रत्येक जाहीर सभेत त्याविषयी श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लाभार्थी महिलांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. कोणत्याही शासकीय योजनेचे श्रेय राजकीय पक्षाला घेता येत नाही. मात्र भारतीय जनता पक्षाला पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे. त्यामुळे ते प्रत्येक शासकीय योजना आणि त्याचे लाभार्थी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला काँग्रेस पक्ष सडेतोड उत्तर देईल. महाविकास आघाडीचे उमेदवार या विरोधात मतदारांमध्ये जनजागृती करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

भाजप नेते खासदार महाडिक यांनी कोल्हापूर येथे केलेल्या या विधानामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. या विधानाच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर खासदार महाडिक यांनी बचावात्मक पवित्रा घेतला होता. आपल्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. मात्र खासदार महाडिक यांच्या विधानामुळे भाजप चांगलेच बॅकफूटवर गेले आहे, हे मात्र स्पष्ट दिसू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com