Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर आज तोडगा निघणार? राम शिंदे पुन्हा आंदोलकांना भेटणार

Ram Shinde to Meet Protesters : राज्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसीमध्ये वाद सुरू आहे. दुसरीकडे धनगर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत...
Dhangar Reservation Protest
Dhangar Reservation ProtestSarkarnama
Published on
Updated on

Dhangar Reservation In Maharashtra : धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी उपोषण-आंदोलनाने जोर धरलेला असताना सरकार आता धनगर समाजाच्या मागणीबाबत अॅक्शन मोडवर आले आहे.

राज्य सरकारने 9 सदस्यीय समिती अभ्यास गट स्थापनेचा आदेश घेऊन माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी चौंडीत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावर यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे आमदार राम शिंदे यांना सांगितले.

Dhangar Reservation Protest
Dhangar Community : यशवंत सेनेचे उपोषण थांबवण्यात राम शिंदे अपयशी; सरकारकडून समिती स्थापन, मात्र...

राज्य सरकारने धनगर समाजाच्या एसटी समावेशासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. सरकारच्या या आदेशाची प्रत काल माजी मंत्री भाजप आमदार राम शिंदे यांनी चौंडी इथे बेमुदत उपोषणाला बसलेल्या यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

समिती स्थापनेबाबत यशवंत सेनेने समाधान व्यक्त केले असले तरी समिती किती दिवसांत अहवाल देणार हे स्पष्ट नसल्याने आणि मागणीबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नसल्याने यशवंत सेनेने आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर यशवंत सेनेची रात्री उशिरा चौंडीतच कोअर कमिटीची तातडीची बैठक घेण्यात आली. दरम्यान, शासनाच्या वतीने आंदोलकांशी मध्यस्थी करणारे राम शिंदे यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. समितीच्या कार्यकाळाबाबत आंदोलकांचा असलेला आग्रह आदी विषयांवर सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे.

या अनुषंगाने राम शिंदे आज पुन्हा चौंडीत उपोषणकर्ते आणि यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सरकारने धनगर समाजाच्या मागणीबाबत नव्याने घेतलेले सकारात्मक निर्णय सांगणार आहेत. त्यामुळे यशवंत सेना यानंतर आंदोलनाबाबत आपला निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे.

चौंडीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही यशवंत सेनेने चौंडीत तब्बल 21 दिवस उपोषण आंदोलन केले होते.

त्यावेळी सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी चौंडीत येत 50 दिवसांत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशासंदर्भात निर्णय केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते.

यशवंत सेनेच्या वतीने उपोषणकर्ते राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील, प्रदेश सचिव नितीन धायगुडे, प्रदेश मीडियाप्रमुख स्वप्नील मेमाणे समाधान पाटील, किरण धालपे आदी रात्री झालेल्या कोअर कमिटी बैठकीस उपस्थित होते.

Dhangar Reservation Protest
Ram Shinde : धनगर आरक्षणासाठी चौंडीत सुरू असलेल्या उपोषणस्थळी राम शिंदेंनी भेट देत केलं 'हे' विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com