BJP Politics : भाजपच्या ओबीसी मोर्चा कार्यकारिणीत तब्बल अकराशे पदाधिकारी!

Dhule city BJP OBC cell appointed 1100 office bearers -ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या हस्ते झाले नियुक्तीपत्र वितरण
BJP Dhule city OBC cell
BJP Dhule city OBC cellSarkarnama
Published on
Updated on

Dhule city Politics : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक विस्तारावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा भाग म्हणून धुळे शहर ओबीसी मोर्चाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली, शहराच्या कार्यकारीणीपेक्षाही अधिक पदाधिकारी असल्याने तो चर्चेचा विषय आहे. (BJP OBC cell will take a drive in the city for Upcoming elections)

राज्य व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपकडून (BJP) सातत्याने जम्बो कार्यकारीणी नियुक्त करण्याचा प्रघातच झाला आहे. यामध्ये धुळे (Dhule) शहरात व ग्रामीण शाखेच्या ओबीसी विभागाची (OBC) कार्यकारीणी तर शहर कार्यकारीणीहून देखील मोठी झाली आहे.

BJP Dhule city OBC cell
Maharashtra Politics : काँग्रेस म्हणते, `राज्यातील एकनाथ शिंदे सरकार शेतकरीविरोधी`

भाजप ओबीसी मोर्चाची तब्बल एक हजार १०० पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत भाजप ओबीसी युवा मोर्चाच्या धुळे महानगर जिल्हाध्यक्षपदी विक्की परदेशी यांची नियुक्ती झाली. मार्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संमतीने ही कार्यकारीणी निश्चित करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष- दिनेश बागूल आणि भगवान गवळी, सुरेश अहिरराव, प्रमोद पाटील, पुरुषोत्तम कोतकर, डॉ. राहुल बच्छाव, दीपक काकुस्ते, अमोल सूर्यवंशी, निनाद पाटील, मनोज चौधरी, संध्या खोंडे या दहा सरचिटणीसांचा त्यात समावेष आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन पक्षाच्या विस्तारात सहभागी व्हावे. विशेषतः केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार करण्यासाठी कार्यकारीणीचा विस्तार केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र एव्हढी मोठी कार्यकारीणी जाहीर केल्याने त्याचे व्यवस्थापन व अंतर्गत संवाद कसा होणार, याची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी नियुक्तीपत्र स्विकारण्यास मोठी गर्दी झाली होती. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप धुळे विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल, शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभा चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार आदींसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

BJP Dhule city OBC cell
Lok Sabha Election : ...तर 'वंचित' लोकसभेच्या सर्व जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ'ला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com